Mahashivaratri 2025 Dainik Gomantak
Video

Mahashivaratri: मुळगावच्या पुरातन रामनाथ स्थळी यंदा प्रथमच महाशिवरात्री उत्सव

Mahashivaratri Goa: पुरातन इतिहास आणि श्रद्धास्थान असलेल्या मुळगावमधील ‘रामनाथ’ या स्थळी यंदा प्रथमच महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोलीतील विविध देवस्थानात महाशिवरात्री उत्सव परंपरेप्रमाण साजरा करण्यात येणार आहे. पुरातन इतिहास आणि श्रद्धास्थान असलेल्या मुळगावमधील ‘रामनाथ’ या स्थळी यंदा प्रथमच महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे. मुळगाव येथील खाणीच्या पायथ्याशी हे श्रद्धास्थान असून या स्थळाला पांडवकालीन इतिहास असल्याचा अंदाज आहे. झाडाझुडपांनी वेढलेल्या या परिसराची सध्या स्थानिकांकडून साफसफाई करण्यात आली असून महाशिवरात्री साजरी करण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.

कारापूर येथील श्री महादेव देवस्थानात वर्षपद्धतीप्रमाणे महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवारी (ता. २५) संध्याकाळी मंदिरात धार्मिक विधी, तसेच मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. रात्री ९ वा. फोंडा येथील श्री शांतादुर्गा शिवरंजनी कला संघातर्फे समईनृत्य होणार आहे. रात्री १० वा. रवळनाथ क्रिएशन करमळी प्रस्तुत ‘टाईम फेल’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. बुधवारी (ता. २६) महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासून भक्तांसाठी मुक्तद्वार व अभिषेक होईल. तद्‍नंतर मंदिरात धार्मिक विधी. दुपारी सार्वजनिक लघुरुद्र व नंतर भजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि संध्याकाळी ६.३० वा. हरीपाठ होणार आहे. नंतर रात्री ९ वा. महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

वाठादेव-डिचोली येथील श्री वाठादेव देवस्थानात बुधवारी (ता. २६) महाशिवरात्री विविध कार्यक्रमांनिशी साजरी करण्यात येणार आहे. सकाळी ६ वा. श्रींस अभिषेक करण्यात आल्यानंतर दिवसभर भक्तभाविकांसाठी श्रींस स्वहस्ते अभिषेक करण्याची संधी मिळणार आहे. सायंकाळी श्रींची पूजा, प्रार्थना व तीर्थप्रसाद होणार आहे. रात्री ८ वा. सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT