Lairai Jatra Dainik Gomantak
Video

Lairai Jatra: ‘लईराई’च्या जत्रेत स्टॉलसाठी मोकळीक द्या! खाजेकार संघटनेची मागणी; व्यावसायिक अस्वस्थ

Lairai Jatra Shirgao: शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रेवेळी यंदा दुकाने घालण्यास मिळणार नसल्याने अन्य व्यावसायिकांसह आता खाजेकारही अस्वस्थ बनले आहेत.

Sameer Panditrao

डिचोली: शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रेवेळी यंदा दुकाने घालण्यास मिळणार नसल्याने अन्य व्यावसायिकांसह आता खाजेकारही अस्वस्थ बनले आहेत. जत्रेच्या दिवशी व्यवसाय करण्यास मिळाला नाही, तर आम्ही आर्थिक संकटात येणार, अशी खंत अखिल गोवा खाजेकार संघटनेने व्यक्त केली असून, जत्रेला स्टॉल थाटण्यास आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी (सोमवारी) डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.

गेल्यावर्षी जत्रेच्या दिवशी जी दुर्घटना घडली, त्याबद्धलही संघटनेने दुःख व्यक्त केले आहे. गेल्यावर्षीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा जत्रेच्या फेरीत स्टॉल घालण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. न्यायालयानेही तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विशेष करून खाजे व्यावसायिकांवर आकांत आला आहे. ‘खाजे’ ही गोव्याची ओळख आणि संस्कृती असून, या व्यवसायाला मोठी परंपरा आहे. खाज्याशिवाय जत्राच नाही. असे समीकरण बनले आहे. दरवर्षी शिरगावात होणाऱ्या जत्रेवेळी भरणाऱ्या फेरीत ५० हून अधिक खाज्याची दुकाने असतात. जत्रेला येणारा प्रत्येक भाविक खाजे खरेदी करतात.

खाजे खरेदीतून जत्रेच्या एकाच दिवशी लाखो रूपयांची उलाढाल होत असते. खाजे हा व्यावसायिकांचा मुख्य व्यवसाय असून, हा व्यवसाय ठराविक काळापुरता मर्यादित आहे. बहूतेक व्यावसायिक याच धंद्यावर अवलंबून असून, ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तेव्हा सरकारने खाजे व्यावसायिकांचा विचार आणि भाविकांची गरज ओळखून वर्षपद्धतीप्रमाणे स्टॉल थाटण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष राजाराम चणेकर यांनी केली आहे.

स्टॉल घालण्यास मुभा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेवून केली आहे, असेही राजाराम चणेकर यांनी सांगितले. हवे तर निर्बंध घाला, पण श्री लईराईच्या जत्रेदिवशी स्टॉल घालण्यास परवानगी द्या, अशी मागणी भूपेंद्र गावकर यांच्यासह संघटनेचे सचिव एकनाथ रायकर यांनी केली आहे. यावेळी संघटनेचे संदेश गोवेकर, उदय मणेरकर, विवेक साळगावकर, गजानन केरकर, गोपीनाथ रायकर, मनोज गावकर आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT