Kala Rakhon Mand  Dainik Gomantak
Video

Kala Academy: प्रतिष्ठित स्पर्धा 'कला अकादमी'त नको! 'कला राखण'ची राज्यनाट्यसाठी जागा बदलण्याची मागणी

Kala Rakhon Mand: कला अकादमीतर्फे नुकतीच मराठी ‘अ’ गट नाट्य स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, कला अकादमीतील असंख्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा इतरत्र आयोजित करण्याची मागणी कला राखण मांडतर्फे करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Kala Academy Issues

पणजी: कला अकादमीतर्फे नुकतीच मराठी ‘अ’ गट नाट्य स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, कला अकादमीतील असंख्य समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा इतरत्र आयोजित करण्याची मागणी कला राखण मांडतर्फे करण्यात आली आहे. कला राखण मांडचे सचिव सिसील रॉड्रीग्ज यांनी आज पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी केली.

सिसील रॉड्रीग्ज यांच्या मते, कला अकादमीच्या वातानुकूलन यंत्रणेपासून ते साऊंड सिस्टम पर्यंत अनेक समस्या आहेत. विशेषतः दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अशा स्थितीत या नाट्यगृहात मराठी ‘अ’ गट नाट्य स्पर्धा आयोजित करणे कलाकारांवर अन्याय करण्यासारखे आहे. मराठी ‘अ’ गट नाट्य स्पर्धा ही राज्यातील एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे. अशा स्पर्धेसाठी दर्जेदार नाट्यगृह आणि साधनसामग्रीची आवश्यकता असते. कला अकादमीमधील सध्याची परिस्थिती पाहता, ही स्पर्धा इतरत्र आयोजित करण्याची गरज आहे.यावेळी ज्ञानेश मोघे आणि प्रशांती तळपणकर यांची उपस्थिती होती.

मुख्य मुद्दे

कला अकादमीतील समस्यांमुळे मराठी ‘अ’ गट नाट्य स्पर्धा इतरत्र आयोजित करण्याची मागणी.

कला अकादमीतील वातानुकूलन यंत्रणा, साऊंड सिस्टम, छत गळती यांसारख्या समस्या.

दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहातील परिस्थिती बिकट.

मराठी ‘अ’ गट नाट्य स्पर्धेसाठी दर्जेदार नाट्यगृह आणि साधनसामग्रीची आवश्यकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT