security increase in Margao market Dainik Gomantak
Video

Margao Market: दुकाने 500 रक्षक दोन! मडगाव मार्केटची व्यथा; सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांचे पालिकेला निवेदन

Margao Market Theft News: मडगाव येथील न्यू मार्केटमध्ये चोरीची प्रकरणे वाढत असताना नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आता सुरक्षा रक्षक वाढविणार अशी घोषणा केली आहे.

Sameer Panditrao

New Margao Market Security Demand

सासष्टी: मडगाव येथील न्यू मार्केटमध्ये चोरीची प्रकरणे वाढत असताना नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी आता सुरक्षा रक्षक वाढविणार अशी घोषणा केली आहे. आपण या संदर्भात मुख्याधिकारी मेल्विन वाझ यांच्याशी चर्चा करून चार सुरक्षा रक्षक नियुक्त करणार आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितले.

यापूर्वी केवळ दोनच सुरक्षा रक्षक होते, पण मार्केटमध्ये ५०० ते ५५० दुकाने असल्याने दोन सुरक्षा रक्षक पुरेसे नाहीत हे आपल्यालाही मान्य आहे असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. या मार्केटमधील काही दुकानांना शटर्स घालणे शक्य नाही. कारण या दुकानांना चारही बाजूनी भिंती नाहीत. ही दुकाने कित्येक दशकांपासून प्लास्टिक व दोरीने बांधून बंद केली जातात, असेही नगराध्यक्षांनी सांगितले.

न्यू मार्केट असोसिएशनने मार्केट रात्री १०.३० वाजता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, तो योग्य असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. सकाळी मार्केट कधी उघडायचे व रात्री कधी बंद करायचे याची वेळ ठरवणे चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

व्यापाऱ्यांचे पालिकेला निवेदन

मडगाव न्यू मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ नाईक व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी नगराध्यक्षांची भेट घेऊन त्यांना चोरीबद्दलची माहिती दिली. तसेच निवेदन सादर करून सुरक्षा रक्षक वाढविणे, मार्केट उघडे व बंद करण्याच्या वेळा निश्र्चित करणे, पार्किंग पद्धती, स्थलांतरितांचे अतिक्रमण आदी विषयांकडे लक्ष वेधले आहे.

‘मडगावकरांची सुरक्षा सुनिश्चित करावी’

मडगावकरांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मडगावचो आवाजचे प्रभव नायक यांनी दक्षिण गोवा पोलिस अधिक्षकांना निवेदन सादर करून चोरी, गुन्हे आणि समाजकंटकांनी निर्माण केलेले उपद्रव रोखण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली. मडगाव न्‍यू मार्केटातील चार दुकाने फोडल्‍याच्‍या पार्श्वभूमीवर नायक यांनी ही मागणी केली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान रहदारीचे नियमन करणे आणि जीवघेणे अपघात टाळण्यासाठी दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस फौजफाटा तैनात करण्याची मागणी त्‍यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT