Mollem Tree Theft Dainik Gomantak
Video

Mollem Tree Theft: मोले अभयारण्यात सागवानी लाकडांची चोरी, दोघेजण ताब्यात

Mollem Crime News: रघू व दिलीप घटनास्थळी आल्यानंतर त्यांना मुद्देमालासह फर्नांडिस यांनी इतर कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

Sameer Panditrao

फोंडा: मोले अभयारण्य क्षेत्रातील वळंडव येथील सागवानाची दोन मोठी झाडे कापून त्याचे १३ तुकडे करून चोरून नेण्याच्या प्रयत्नात असताना वन खात्याचे आरएफओ अनिल फर्नांडिस व इतर कर्मचाऱ्यांनी रघु नाईक (२६, कुंकळ्ळी) व दिलीप तलवार (४२, किर्लपाल भगवती) यांना रंगेहात पकडले आहे.

वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वळंडव येथील उमेश नामक व्यक्तीने आपल्या जमिनीत सागवानाची मोठी झाडे असल्याचे सांगून २५ हजार रुपयांत कापून नेण्यासाठी दिली होती. त्यानुसार कुंकळ्ळी येथील रघु नाईक व दिलीप तलवार यांनी ती झाडे कापली व १३ तुकडे केले होते. त्यानुसार वन खात्याचे कर्मचारी त्यांच्या पाळतीवर होते. आज सकाळी रघू व दिलीप घटनास्थळी आल्यानंतर त्यांना मुद्देमालासह फर्नांडिस यांनी इतर कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. उमेश नामक व्यक्तीला उद्या रितसर ताब्यात घेणार असून वन कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sound Limit: 'गोव्यात ध्वनिमर्यादा रात्री 11 वाजेपर्यंत वाढवा'! TTAG ची मागणी; नियोजनाअभावी ‘सनबर्न’ गेल्याचा केला दावा

Morjim: हॉटेलचे सांडपाणी सोडले समुद्रात! मोरजी येथील किळसवाणा प्रकार; प्लास्टिक पिशव्यांमधून टाकला कचरा

Rashi Bhavishya 10 August 2025: आर्थिक फायदा, आर्थिक स्थितीत सुधारणा मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा

Israel-Hamas War: क्रीडाविश्वात खळबळ, इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू

Mopa Airport: उबर अ‍ॅपद्वारे भाडे घेणाऱ्या 4 जणांवर वाहतूक विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT