Rumdamol Panchayat Dainik Gomantak
Video

Rumdamol: बेकायदा दुकानांमुळे रुमडामळ परिसरात 'ट्रॅफिक जाम'! पंचायतीकडून 30 जणांना नोटिसा जारी

Rumdamol Targets Illegal Businesses: रुमडामळ, दवर्वी पंचायत क्षेत्रात अनेक बेकायदा व्यवहार चालू आहेत. काहींनी रस्त्यालगत बेकायदा दुकाने थाटली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal shops in Rumdamol

सासष्टी: रुमडामळ पंचायत क्षेत्रात अनेक बेकायदा व्यवहार चालू आहेत. काहींनी रस्त्यालगत बेकायदा दुकाने थाटली आहेत. काहींनी नाल्यांवर गाडे थाटले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.

वाहतूक विभागाने याची दखल घेत पंचायतीला हे गाडे व दुकाने हटविण्यास सांगितले आहे. त्यानुसार पंचायतीने या व्यावसायिकांना नोटिसा जारी केल्या आहेत.

पंच समिउल्ला फणिबंद यांनी सांगितले की, आम्ही व्यापारी व गाडेवाले मिळून ३० जणांना नोटिसा जारी केल्या आहेत. आठ दिवसांच्या आत त्यांनी हे गाडे हटवावे किंवा जो रस्ता व्यापला आहे तो खाली करावा. या आदेशाचे पालन केले नाही तर ही बांधकामे पंचायतीतर्फे पाडली जातील.

दुसरीकडे जागा द्या

पंच विनायक वळवईकर यांनी सांगितले की, केवळ मोजक्याच व्यापारी व गाडेवाल्यांना नोटिसा का? या पंचायत क्षेत्रात अनेक बेकायादा धंदे, व्यावसाय बेकायदा चालू आहेत.काही ठरावीक लोकांवरच कारवाई न करता बेकायदा व्यावहार करणाऱ्या सर्वांनाच पंचायतीने नोटीस पाठवावी. तसेच रस्त्यांवरील गाडे व दुकाने हटविण्यापूर्वी त्यांना पंचायतीने दुसरीकडे जागा द्यावी, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

Drug Bust Case: गोव्यात सात दिवस पाळत, मग ठोकल्या बेड्या! तेलंगण पोलिसांची अमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई; एलएसडीसह चरसही जप्त

Pakistan Violence: ईशनिंदेचा खोटा आरोप, संतापलेल्या जमावाने पेटवले घर-दुकान, 35 ख्रिश्चन कुटुंबांनी सोडले गाव; पाकिस्तानात पुन्हा निघाले मानवतेचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT