Heavy Rain In Sattari Dainik Gomantak
Video

Heavy Rain In Sattari: मुसळधार पावसामुळे वेळूस नदी तुडुंब! बागायतीचेही नुकसान

Sattari: वेळुस नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागल्यामुळे नदीच्या बाजूला असलेल्या रामा गावकर यांच्या बागायतीत पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे.

Sameer Amunekar

वेळुस नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागल्यामुळे नदीच्या बाजूला असलेल्या रामा गावकर यांच्या बागायतीत पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी रात्री मुसळधार पावस होता, त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. मात्र शुक्रवार सकाळपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी कमी झाले आहे. वेळुस येथील ही मोठी नदी असल्याने जोरदार पाऊस पडू लागला की या नदीला पूर येतो. या पावसाळ्यात पहिल्यांदाच नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे.

रामा गावकर यांनी सांगितले की, दर वर्षी वेळुस नदीच्या पाण्याची पातळी वाढली की नदीला पूर येतो व आमची बागायत पाण्याखाली जाते. यंदा तसा पाऊस नव्हता. मात्र गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे बागायत पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे केळीची झाडे उन्मळून पडलेली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात बागायतीचे नुकसान झाले आहे. नदीवर बंधारा बांधल्यापासून ही स्थिती निर्माण होत आहे. बंधाऱ्यावर वाहून आलेली लाकडे अडकली असल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे पाणी बागायतीत घुसते. संबंधित खात्याने पावसाळ्यापूर्वी येथील गाळ योग्यप्रकारे साफ केला नव्हता, त्यामुळे पाणी तुंबते. सुदैवाने पावसाचा जोर कमी झाल्याने आणखी कोणती हानी झाली नाही.

सरकारने नदीच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून दिली पाहिजे. यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे, मात्र अजून काही झाले आहे. मी एक शेतकरी असून अश्या प्रकारे केलेली मेहनत पाण्याखाली जात असल्याचे दुख होते. दरम्यान, संध्याकाळी पावसाचा जोर कमी होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coconut in Goa: गोमंतकीयांना कर्नाटक, केरळमधून आयात केलेल्या नारळावर अवलंबून राहावे लागावे हे दुर्दैव..

Goa Opinion: कामतांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, मनोहर पर्रीकरांना हे रुचले असते का?

Human Trafficking: फोंड्यात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, पीडित तरुणीची सुटका; पश्चिम बंगाल, यूपीतील 3 जणांना अटक

Patri Ganpati Goa: दक्ष राजाच्या यज्ञावेळी अपमानीत झालेल्या देवी 'पार्वती'ने यज्ञकुंडात उडी घेतली; गोव्यातील पत्री पूजनाची परंपरा

गुळातही सापडली भेसळ! राज्यात प्रोटीनच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यांना FDAचा दणका

SCROLL FOR NEXT