Vishwajit Rane Dainik Gomantak
Video

Vishwajit Rane: डिचोली तालुका दत्तक घेणार! पत्रकारांना मोफत उपचार, रुग्णवाहिका वाढवणार; आरोग्यमंत्री राणेंची घोषणांची खैरात

Bicholim Health Camp: पत्रकारांसाठी मोफत, तातडीची आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास मुंबईतही उपचार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राणे यांनी जाहीर केले.

Sameer Panditrao

Vishwajit Rane At Bicholim Health Camp

डिचोली: सरकारला जनतेच्या आरोग्याची काळजी आहे. त्यासाठी रुग्णांना वेळीच आणि चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आपत्कालीनवेळी रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत. यासाठी आरोग्य क्षेत्रात ‘हेलिकॉप्टर’ सेवा सुरू करणे गरजेचे आहे, असे मत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त करून डिचोली तालुका दत्तक घेण्याची घोषणा केली.

डिचोली येथे आयोजित मेगा आरोग्य शिबिराचे उद्‍घाटन केल्यानंतर ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आरोग्य खात्याच्या संचालक गीता नाईक, ‘गोमेकॉ’चे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, दंत महाविद्यालयाच्या डीन डॉ. आताईद आणि डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. सिद्धी कासार उपस्थित होत्या.

आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आरोग्य खात्यातर्फे डिचोलीत आयोजित केलेल्या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात गोवा दंत आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी कर्क, मधूमेह, दंतचिकित्सा आदी विविध आजारांची तपासणी केली. या शिबिराला प्रचंड प्रतिसाद मिळाला. डॉ. सिद्धी कासार यांनी आभार मानले. या शिबिरावेळी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर अन्य नगरसेवक तसेच विविध पंचायतीचे सरपंच आणि पंच उपस्थित होते.

‘मधुमेहा’वर विशेष उपचार पद्धत

सध्या ‘मधुमेह’ हा जीवघेणा आजार बळावत चालला आहे. त्याबद्दल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी चिंता व्यक्त केली. ‘मधूमेह’ आजाराचा प्रतिकार करून रुग्णांची जीवनशैली बदलून त्यांना या आजारातून पूर्णपणे सुरक्षित कसे ठेवता येईल यासाठी आरोग्य खात्यातर्फे अभ्यासपूर्ण विशेष उपचारपद्धत सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार रुग्णांना या सुविधेचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राणे यांनी जाहीर केले.

रुग्णवाहिका वाढविणार

जनतेला वेळीच आणि चांगली आरोग्य सेवा मिळावी. यासाठी १० कार्डियाक मिळून ८५ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी सरकारकडे करणार आहे. ‘सेटलाईट ओपीडी’ सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.

पत्रकारांची काळजी घेणार

राज्यातील पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेताना, पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित रहावे यासाठी पत्रकारांसाठी मोफत आणि तातडीची आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास मुंबईसारख्या राज्यातही त्यांच्यावर उपचार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राणे यांनी जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबल्या'त Team India ची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाला डच्चू, कोणाला संधी?

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

SCROLL FOR NEXT