Ajay Gaude Goa Dainik Gomantak
Video

Gomantak Goud Maratha Samaj: गोमंतक गौड मराठा समाज संघटनेवर अजय गावडे यांची प्रशासक म्हणून निवड

Ajay Gaude Goa: दक्षिण गोवा जिल्हा निबंधकांकडून निर्बंध आणलेल्या गोमंतक गौड मराठा समाज या संघटनेवर आता क्रीडा खात्याचे संचालक डॉ. अजय गावडे यांची प्रशासक म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे.

Sameer Panditrao

मडगाव : ‘निवडणुका योग्य प्रकारे घेतल्या गेल्या नाहीत’ असा ठपका ठेवून दक्षिण गोवा जिल्हा निबंधकांकडून निर्बंध आणलेल्या गोमंतक गौड मराठा समाज या संघटनेवर आता क्रीडा खात्याचे संचालक डॉ. अजय गावडे यांची प्रशासक म्हणून सरकारने नियुक्ती केली आहे. संघटनेवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू झाल्‍याचे वृत्त ‘गोमन्‍तक’ने प्रसिद्ध केले होते. आज हा आदेश जारी करण्यात आला. सहा महिन्यासाठी त्यांची संघटनेवर प्रशासक म्हणून नेमणूक करण्‍यात आली आहे. संघटनेचा दैनंदिन कारभार हाताळण्याबरोबरच समाजाचे जात दाखले देण्याचा अधिकार त्यांना दिला आहे. यापूर्वी या संघटनेवर विश्‍‍वास गावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती निवडण्यात आली होती. मात्र ही निवडणूक योग्य प्रकारे घेतली गेली नाही असा आक्षेप घेऊन जिल्हा निबंधक कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा निबंधक सूरज वेर्णेकर यांनी ही समिती दाखल करून घेण्यास नकार देतानाच या समितीला कामकाज करण्यास निर्बंध घातले होते. पण हे निर्बंध असतानाही या समितीने जात दाखले देणे सुरूच ठेवल्याने या संघटनेवर प्रशासक नेमावा अशी शिफारस जिल्हा निबंधकांनी सरकारला केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT