Goa UniVersity VC Controversy Dainik Gomantak
Video

Goa University: गोवा विद्यापीठात योग्य नेतृत्व, दृष्टिकोनाची कमतरता असल्याची खंत व्यक्त; Video

Goa University VC Controversy: चर्चेत शिक्षणतज्ज्ञ दिनार भाटकर, सुदिन नायक आणि गोवा विद्यापीठ कार्यकारी समितीचे सदस्य प्रसाद रांगणेकर उपस्थित होते.

Sameer Panditrao

पणजी: गोवा विद्यापीठात गोमंतकीय प्राध्यापकांचा भरणा असल्याने विद्यापीठाचे मानांकन कमी होत असल्याचे कुलगुरू हरिलाल मेनन यांचे विधान चुकीचे असून गोवा विद्यापीठातील प्रत्येकाचे संशोधन, शैक्षणिक, सामाजिक बांधिलकी आदी सर्वंकष मूल्यांकन करणे गरजेचे असल्याचे मत दिनार भाटकर यांनी व्यक्त केले. ते ‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात बोलत होते.

या चर्चेत शिक्षणतज्ज्ञ दिनार भाटकर, सुदिन नायक आणि गोवा विद्यापीठ कार्यकारी समितीचे सदस्य प्रसाद रांगणेकर उपस्थित होते. दरम्यान, जे विद्यार्थी ‘पीएचडी’ करतात त्यातील किमान १० टक्के ‘पीएचडी’ या गोव्‍यासंबंधित असायला हव्‍यात. खरे तर सद्यस्थितीत विद्यापीठात योग्य नेतृत्व आणि दृष्टिकोनाची कमतरता असल्याची खंत भाटकर यांनी व्यक्त केली.

गोवा विद्यापीठाच्या माध्यमातून गोमंतकीयांच्या हिताच्या गोष्टी झाल्या पाहिजेत. परंतु हेदेखील लक्षात घेतले पाहिजे की आता आमची स्पर्धा जागतिक स्तरावर आहे. त्यामुळे गोवा विद्यापीठात प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भरती करताना तेथे केवळ गोमंतकीयांनाच प्राधान्य देण्यात आले पाहिजे; परंतु नवीन अभ्यासक्रमात ज्याचे आपल्याकडे प्राध्यापक उपलब्ध नाहीत जसे की एआय, रोबोटिक्स अशावेळी नियमात शिथिलता करण्यास हरकत नाही.

परंतु ही नेमणूक करताना गोमंतकीयांचे हित आणि उत्कर्ष ध्यानात ठेवूनच नीरक्षीर पद्धतीने व्हावी आणि त्यासाठी एक विशेष समिती असावी. या शिथिलतेचा गैरफायदा मात्र कोणी घेता कामा नये, असे मत शिक्षणतज्ज्ञ सुदिन नायक यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ujjwala Scheme: 25 लाख महिलांना मिळणार मोफत एलपीजी कनेक्शन, 'उज्ज्वला' योजनेचा केला विस्तार; महिला सबलीकरणासाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल

Navratri Day 2: दीर्घायुष्य आणि यश हवे असल्यास करा ब्रह्मचारिणीची पूजा; नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा शुभ रंग जाणून घ्या!

Navratri in Goa: ना गरबा, ना दुर्गापूजा; नऊ प्रकारच्या धान्यांची पेरणी आणि मखरोत्सव; गोव्यातील नवरात्रीचं वेगळेपण काय?

IND vs PAK: 'सूर्या ब्रिगेड'चा विजयाचा नवा अध्याय! टीम इंडियानं केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी, आता पाकिस्तानविरुद्ध रचणार इतिहास

कोणाचीही गय नाही! रामा काणकोणकर मारहाण प्रकरणाच्या मुळाशी जाणार; मुख्यमंत्री सावंतांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT