Goa University Sadetod Nayak  Dainik Gomantak
Video

Goa University: गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंनी जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा; Video

Goa University Controversy: विद्येच्या मंदिरात असे प्रकार घडणे ही निंदणीय बाब आहे. ज्यावेळी आम्हाला हा प्रकार समजला, त्यावेळी आम्ही आंदोलन केले. चौकशी आणि कारवाईची मागणी देखील केली.

Sameer Panditrao

पणजी: एक प्राध्यापक आपल्या प्रेमिकेला मदत करण्यासाठी विद्यापीठातील अवैधपणे सर्व यंत्रणा हाताळतो. तिला परीक्षेत मदत करतो आणि प्राध्यापक, कुलगुरूंना ही बाब समजून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या पेपरफुटी प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीने गोवा विद्यापीठात माजलेली बजबजपुरीच चव्हाट्यावर आणली आहे. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी तसेच कुलगुरूंनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी एनएसयूआय गोवा अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी केली.

‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात गोवा फॉरवर्डचे नेते प्रशांत नाईक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संयोजक शुभम मळीक यांनी सहभाग घेतला होता.

प्राध्यापक दोषी आहेत हे आम्हाला माहीत होते. विद्यार्थ्यांमध्ये देखील याविषयी चर्चा होती, तरीदेखील विद्यापीठ प्रशासन कारवाई करत नव्हते याचेच आश्‍चर्च वाटत होते. आतातरी याविषयी कठोर कारवाईची अपेक्षा असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

चुकीच्या गोष्टी बंद व्हाव्यात

विद्येच्या मंदिरात असे प्रकार घडणे ही निंदणीय बाब आहे. ज्यावेळी आम्हाला हा प्रकार समजला, त्यावेळी आम्ही आंदोलन केले. चौकशी आणि कारवाईची मागणी देखील केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या घटनेचा निषेध करते. जे संबंधीत या प्रकरणात दोषी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी, असे शुभम मळीक यांनी सांगितले.

कुलगुरू पडले तोंडघशी

गोवा विद्यापीठाला ‘नॅक’ मानांकनात ‘ए प्लस’ प्राप्त झाले आहे. या ‘नॅक’च्या गोवा विद्यापीठाच्या समितीत सर्वाधिक गोवेकर प्राध्यापक होते, परंतु कुलगुरूंनी गोव्यातील प्राध्यापकांमुळे मानांकन घटत असल्याचे विधान केले होते. त्यामुळे ते आता तोंडघशी पडले आहेत. सर्वच विद्वान केरळात आहेत असे होत नाही. त्यामुळे गोमंतकीयांचा अपमान करणाऱ्या त्या विधानाबाबत कुलगुरू प्रो. हरिलाल मेनन यांनी समस्त गोमंतकीयांची जाहीर माफी मागावी अशी मागणी प्रशांत नाईक यांनी केली.

‘गोमन्तक’ने विषय लावून धरला

गोवा विद्यापीठात झालेल्या पेपर फुटीचे प्रकरण ‘गोमन्तक’ने लावून धरले. त्यामुळेच हे प्रकरण समोर आले. त्याबद्दल दै. ‘गोमन्तक’चे अभिनंदन. गोवा विद्यापीठात घडलेल्या प्रकरणानंतर चौकशी करण्याऐवजी प्राध्यापकाची पाठराखण करण्याचे काम कुलगुरूंनी केले हा कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार आहे.

जर गोवा विद्यापीठात असे प्रकार सुरू असतील, तर विद्यार्थी संघटना शांत का आहेत. १९८० साली ज्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी गुण वाढविले, त्यावेळी विद्यार्थ्यांनी आंदोलन करून मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडले होते, परंतु आता तसे होताना दिसत नसल्याची खंत प्रशांत नाईक यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: रात्री रस्त्यांवर गवे, बिबट्याचा मुक्तसंचार; फोंडा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत

Mapusa: नगराध्यक्षांच्या प्रभागातच रस्त्यांची दुर्दशा! गटारावरील लाद्या उखडल्या; म्हापशात वाहने चालवणे ठरतेय जोखमीचे

Vasco Landslide: वाडे-वास्‍कोत कोसळली दरड! घराला धोका; कुटुंब जगतेय भीतीच्‍या छायेखाली

Goa Politics: काँग्रेस,‘आप’मधील दरी वाढणार! निरीक्षकांचा अंदाज; ‘झेडपी’त दोन्ही पक्ष स्वबळाच्या तयारीत

Goa Tourism: गोव्यात 54 लाख पर्यटक! सहा महिन्यात विक्रमी भरारी; पर्यटनाचा नवा उच्चांक नोंद

SCROLL FOR NEXT