Minister Babush Monserrate Dainik Gomantak
Video

Goa Unemployment Rate: राज्यातील बेरोजगारीचा रिपोर्ट अमान्य; मंत्री बाबुश स्पष्टच बोलले

Minister Babush Monserrate: केंद्रीय कामगार ब्‍युरोने गोव्‍यातील बेरोजगारीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. आकडेवारी जाहीर होताच राजकीय राळ उडाली.

Manish Jadhav

केंद्रीय कामगार ब्‍युरोने गोव्‍यातील बेरोजगारीची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. आकडेवारी जाहीर होताच राजकीय राळ उडाली. विरोधकांनी वाढत्या बेरोजगारीच्या मुद्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे, केंद्रीय कामगार ब्‍युरोने गोव्‍यातील बेरोजगारीची दिलेली आकडेवारी पूर्णपणे चुकीची आहे आणि आम्ही ती स्वीकारत नाही, असे म्हणत कामगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सरकारची बाजू मांडली. सदर अहवाल जाहीर होण्‍यापूर्वीच गोव्‍याने आक्षेप नोंदवूनही केंद्राने दखल न घेतल्‍याने कामगार खाते तोंडघशी पडले आहे. केंद्रीय कामगार ब्‍युरोने जाहीर केलेल्या आकडेवारीत गोव्‍यातील बेरोजगारीची टक्केवारी 8.7 टक्के दाखवली आहे. मोन्सेरात पुढे म्‍हणाले की, गोव्याच्या कामगार विभागाकडून ही आकडेवारी देण्‍यात आलेली नाही. केंद्रीय पातळीवरुन जाहीर झालेली बेरोजगारीची आकडेवारी आम्‍ही स्वीकारत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT