Goa ssc board exams 2026 Dainik Gomantak
Video

Goa SSC Board Exams: धावेचे परीक्षेक सुरूवात; Video

Goa ssc board exams 2026: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतली जाणारी दहावीची वार्षिक परीक्षा उद्या, ता. १३ मार्चपासून सुरू होणार असून ती ९ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतली जाणारी दहावीची वार्षिक परीक्षा उद्या, ता. १३ मार्चपासून सुरू होणार असून ती ९ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

राज्यातील ३२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून, परीक्षा सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. या परीक्षेसाठी एकूण २०,६५९ (नियमित नवीन उमेदवार) उमेदवार बसतील, ज्यामध्ये ९,८६८ मुली आणि १०,७९१ मुले आहेत.

गेल्या वर्षी, मार्च २०२५ मध्ये एकूण १८,८३७ (नियमित फ्रेश) उमेदवारांनी परीक्षा दिली होती. सर्व परीक्षा केंद्रांची आसन व्यवस्था मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ४५ मिनिटे किंवा जास्तीत जास्त सकाळी ९ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या परीक्षेसाठी एकूण २०,६५९ नियमित नवीन उमेदवारांबरोबर पुनर्परीक्षार्थी ४, सवलत मिळालेले पुनर्परीक्षार्थी २११, खासगी नियमित विद्यार्थी ८१५, सवलत मिळालेले खासगी पुनर्परीक्षार्थी १०६ आणि विशेष (पार्ट इम्प्रुव्हमेंट) १ असे इतर परीक्षार्थी असणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कदंब बसस्थानकात खासगी बसचालकांची मनमानी! म्हापशात प्रवासी, वाहनधारक त्रस्त: नागरिकांकडून कारवाईची जोरदार मागणी

CM Pramod Sawant: आंबेडकरांना काँग्रेसकडूनच खोडा, दोनवेळा लोकसभेत जाण्यापासून रोखलं; मुख्यमंत्री सावंतांचा घणाघात

Goa Assembly Budget Session: विधानसभेचे स्थगित अधिवेशन पुन्हा बोलावण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे 'मौन'; राज्यपालांच्या सूचनेनंतरही प्रमोद सावंतांनी विषयावर बोलणे टाळले

मैत्रिणीकडे जाते सांगून निघालेल्या मुलीला फसवून पळवलं, लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधमाला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा कायम; हायकोर्टाचा मोठा निकाल

मतदानाच्या आदल्या दिवशी फोंडा पोटनिवडणूक रद्द! एक वर्षाचा कार्यकाळ रिक्त पदापासून की निकालापासून?; सुप्रीम कोर्ट करणार 'फैसला'

SCROLL FOR NEXT