Goa Rain Sadetod Nayak Dainik Gomantak
Video

Goa Rain: गोव्यात बांधकामे वाढली, झोपडपट्टी वाढल्या, पाणी मुरणार तरी कुठे? Video

Goa pre-monsoon rain: राज्यात मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसामुळे सर्वत्र जो हाहाकार उडाला आहे, त्यातून मान्सूनपूर्व नियोजनात सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात मागील दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसामुळे सर्वत्र जो हाहाकार उडाला आहे, त्यातून मान्सूनपूर्व नियोजनात सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. विकासाच्या नावावर जो काही दूराचार सुरू आहे, हा त्याचा परिणाम असून याविरोधात आता तरी जनतेने उठून उभे राहायला हवे, अन्यथा काळ धोक्याचा असल्याचे मत म्हापशाचे नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी व्यक्त केले.

ते गोमन्तक टीव्हीवरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या सडेतोड नायक या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात आप नेत्या सीसील रॉड्रीगीस सहभागी झाल्या होत्या. नार्वेकर म्हणाले की, म्हापशात जी काही परिस्थिती पावसामुळे मागील दोन दिवसांत उद्‍भवली,, त्याबाबत जनप्रतिनिधी म्हणून मी माफी मागतो. म्हापशात सर्वत्र कंत्राटीकरण होत आहे. झोपडपट्टी वाढत आहे, पाणी मुरणार तरी कुठे ? आम्हाला शाश्‍वत विकास म्हणजे काय हेच समजले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

ताळगाव एक ‘टाइम बॉम्ब’

ताळगावात विकासाच्या नावावर डोंगरकापणी, सांडपाणी जलवाहिनीत घुसणे, ताळगावमधील शेतांमध्ये पाणी तुंबून राहणे, असे प्रकार घडत आहेत. ताळगाव एका ‘टाइम बॉम्ब’प्रमाणे स्थिती आहे. ताळगावात जो विकास होतोय तो जनतेसाठी नसून जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींसाठी आहे. कंत्राटदार, आमदार, यांचे लागेबांधे असल्याने हा प्रकार होत असून आता तरी नागरिकांनी याविरोधात आवाज उठवायला हवा. आपला गोवा सांभाळून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येत लढा देणे गरजेचे असल्याचे सीसील रॉड्रीगीस यांनी सांगितले.

झोपडपट्टीमुळे म्हापशात समस्या

म्हापशाचे आमदार जेथे राहतात तेथेच खाली मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीमुळे पावसात म्हापशात अनेक समस्या निर्माण होतात. मागील दोन दिवसांत ज्यावेळी पाऊस पडला त्यावेळी आमदारांनी स्वतःच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. स्थानिक प्रतिनिधींना विश्‍वासातच घेतले जात नाही, असे म्हापशाचे नगरसेवक शशांक नार्वेकर यांनी सांगितले.

नागरिकांनी आवाज उठवणे गरजेचे

ताळगावात अजून नागरिकांना योग्य पाण्याची सोय नाही, वीज मिळत नाही, अनेक समस्या सर्वसामान्यांना सतावत आहेत असे असून देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे. स्मार्ट सिटीची अवस्था कशी आहे हे कोणाला सांगायला नको, परंतु आता या विरोधात आम्ही एकत्र होत आवाज उठवणे गरजेचे असल्याचे रॉड्रीगीस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT