Goa Political News Dainik Gomantak
Video

Goa Politics: "भाजप फक्त 'बोल बचनगिरी' करतोय" कांदोळकरांचा जोरदार हल्ला

Kiran Kandolkar Goa Politics: माजी आमदार किरण कांदोळकर यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे

Akshata Chhatre

माजी आमदार किरण कांदोळकर यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. "विकासकामांवर लक्ष देण्याऐवजी भाजप फक्त 'बोल बचनगिरी' करत आहे," असा आरोप त्यांनी केला. गोव्यातील जनता भाजपवर नाराज असून, त्यांनी आता या पक्षावर विश्वास ठेवणे सोडून दिले आहे, असेही ते म्हणाले. दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात परिस्थिती यापेक्षा खूप वेगळी होती, अशी आठवणही त्यांनी करून दिली.

थिवीचे सध्याचे आमदार जनतेसाठी काम करण्यात अपयशी ठरले आहेत, असा दावाही कांदोळकर यांनी केला. "सत्तेत असो वा विरोधात, काम करणे महत्त्वाचे आहे. जनता या आमदाराला कंटाळली असून त्यांना बदल हवा आहे. त्यांना मी नेतृत्व करावे असे वाटते," असे ते म्हणाले. आपल्या राजकीय योजनांची पुष्टी करत कांदोळकर यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत थिवीमधून "१००% निवडणूक लढवून जिंकणार" असल्याचे जाहीर केले, जेणेकरून त्यांना जनतेचा आवाज बनून प्रतिनिधित्व करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT