Leopard Attack Dainik Gomantak
Video

Goa Leopard Attack: गोव्यात बिबट्याचा थरार! चरावणे येथे 59 वर्षीय वृद्धाचा हल्ल्यात मृत्यू

Goa Leopard Attack: सत्तरी तालुक्यातील चरावणे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका 59 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Manish Jadhav

सत्तरी तालुक्यातील चरावणे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका 59 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती आपल्या घराच्या परिसरात किंवा शेताच्या कामात असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. हा हल्ला इतका भीषण होता की, त्यामध्ये या वृद्धाचा जागीच प्राण गेला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वाढत्या बिबट्याच्या वावरामुळे चरावणेतील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. वनविभागाने रात्रीच्या वेळी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT