Heavy Rain in Goa Dainik Gomantak
Video

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Goa Weather Update: राज्यात १ जून ते १७ ऑगस्ट या कालवधीत अनेक जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत १०० इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

Sameer Amunekar

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात १ जून ते १७ ऑगस्ट या कालवधीत अनेक जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत १०० इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून. शहरांसह ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत, तर वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, गोव्यातील हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारपासून (१९ ऑगस्ट) पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. आगामी चार दिवस राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी गोव्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. समुद्र किनाऱ्यावरील भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारांनी समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: माजी पर्यटनमंत्र्यांना 13 लाखांचा गंडा, आर्थिक व्यवहारातून फसवणूक; दोघांविरोधात तक्रार नोंद

Ganesh Chaturthi: वय वर्षे 84, तरीही गणरायाची सेवा; वयाच्या 10व्या वर्षांपासून जोपासली आहे मूर्तिकलेची आवड

Goa Live News: मरड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर छापा!

Bear Attack Quepem: चिंताजनक! अस्वलाने केला प्राणघातक हल्ला, केपेतील शेतकरी गंभीर जखमी

Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT