Goa heatwave March 2026 Dainik Gomantak
Video

VIDEO: गोवा तापला! मार्चमध्येच मे महिन्याच्या झळा; अंगाची लाहीलाही झाल्यावर कुत्र्याने शोधला पाण्याचा गारवा; पाहा व्हिडिओ

Goa heatwave March 2026: निसर्गरम्य गोवा सध्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. मार्च महिना संपत असतानाच गोव्यातील तापमानाचा पारा गगनाला भिडलाय.

Sameer Amunekar

निसर्गरम्य गोवा सध्या अभूतपूर्व उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. मार्च महिना संपत असतानाच गोव्यातील तापमानाचा पारा गगनाला भिडला असून, नागरिकांना असह्य उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एकेकाळी हिरवाईने नटलेल्या या राज्यात आता सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत, ज्याचा थेट परिणाम पर्यावरणावर होत आहे. या वाढत्या उष्णतेचा फटका केवळ माणसांनाच नाही, तर मुक्या प्राण्यांनाही बसत असून, त्यांचे हाल पाहावत नाहीत.

ऐन मार्चमध्ये मे महिन्याचा अनुभव

यंदा गोव्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेने रौद्र रूप धारण केले आहे. मार्च महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. भर दुपारी रस्त्यावरून चालणे मुश्किल झाले असून, अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. कडक उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत असून, साध्या कामासाठी बाहेर पडणेही कठीण झाले आहे.

मुक्या प्राण्यांची पाण्यासाठी तगमग

या असह्य उष्म्याचा सर्वात मोठा फटका गोव्यातील वन्य आणि पाळीव प्राण्यांना बसत आहे. पाण्याचे स्त्रोत आटल्यामुळे प्राण्यांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, एक कुत्रा भर उन्हात रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा आसरा घेताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Harassment: 'इन्स्टाग्राम'वरून मैत्री करून युवतीला फसविणारा गजाआड, पोलिस कोठडीत रवानगी; तपास सुरू

Baga Beach Shack Violence: कन्नड गाणी न लावल्याने धिंगाणा, बागा किनारी शॅकवर मद्यधुंद पर्यटकांकडून तोडफोड

Cricket Betting Goa: आसगाव येथे आयपीएलच्या सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा, सातजणांना अटक; 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

Mopa Airport: मोपा विमानतळ प्रवेशमार्गावर निर्बंध, स्थानिकांमध्ये संतापाची लाट; नागरिक, टॅक्सीचालकांचा तीव्र विरोध

समुद्रकिनाऱ्यावर कसं जायचं? विचारत छातीवर हात टाकला, काणकोण येथे महिलेचा विनयभंग; तक्रार नोंदविण्यास पोलिसांचा नकार

SCROLL FOR NEXT