Prasad Lolayekar, Education Secretary Goa Dainik Gomantak
Video

Goa Education: यंदापासून नववीतील विद्यार्थी थेट दहावीत, पाचवी-आठवीत बोर्डासमान परीक्षा; नेमके काय झालेत बदल, पहा Video

Prasad Lolayekar: नवीन शैक्षणिक धोरणानुसार यंदापासून इयत्ता नववीतील विद्यार्थ्याला अंतिम निकालापूर्वीच एप्रिलपासून दहावीच्या वर्गाचा अभ्यासक्रम शिकविण्यात येईल.

Sameer Panditrao

Educational policy in Goa

पणजी: नवीन शैक्षणिक धोरणानुसार यंदापासून इयत्ता नववीतील विद्यार्थ्याला अंतिम निकालापूर्वीच एप्रिलपासून दहावीच्या वर्गाचा अभ्यासक्रम शिकविण्यात येईल. जे विद्यार्थी नववीच्या अंतिम निकालात नापास होतील, त्यांच्यासाठी जुलैमध्ये पुरवणी (सप्लीमेंट्री) परीक्षा असेल. पुरवणी परीक्षेतही जरी विद्यार्थी नापास झाले, तरी देखील त्यांना दहावीची परीक्षा देता येईल, परंतु दहावीचा निकाल हा इयत्ता नववी उत्तीर्ण झाल्यावरच विद्यार्थ्यांना मिळेल, असे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.

दै. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी नवीन शिक्षण धोरण तसेच शैक्षणिक वर्ष बदलाच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. केंद्र सरकारने आठवीपर्यंत सरसकट पास धोरण रद्द केले आहे. आता यापुढे इयत्ता पाचवी आणि आठवीत बोर्डाच्या परीक्षेसमान परीक्षा होणार आहे. पाचवी आणि आठवीच्या परीक्षेत विद्यार्थी अपेक्षित प्रगती नसेल, तर त्याला पाचवी, आठवीत नापास करून अपेक्षित प्रगती केल्याशिवाय पुढील वर्गात पाठविले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी स्मार्ट बोर्डची नव्हे, तर स्मार्ट शिक्षकांची गरज आहे. आम्हाला शिक्षकांना अशाप्रकारे तयार केले पाहिजे, की त्यांना कोणत्याही साधनसुविधेविना विद्यार्थ्यांना शिकविता आले पाहिजे. त्यासाठी भारतीय विज्ञान संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांसाठी प्रशिक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. अशाप्रकारची प्रशिक्षण प्रयोगशाळा उभारणारे गोवा हे पहिले राज्य ठरणार असल्याचे लोलयेकर यांनी सांगितले.

राज्यातील ज्या शाळा पूर्णवेळ विद्यार्थ्यांसाठी शाळा भरविण्यास तयार आहेत अशा सर्व शाळांना सरकार पूर्णपणे सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील सांगितले आहे. दुपारचे जेवण देखील देण्यास आम्ही तयार आहोत. पूर्ण वेळ शाळा सुरू करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांचीही सहमती आहे, परंतु पालक तयार नाहीत. एका पालकाने मुलांना दुपारचे जेवण माशाचे असेल का? असे विचारल्याचे लोलयेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1106 च्या ताम्रपटात उल्लेख असलेला गंडगोपाळ तलाव, करमळीचे सुलभातीचे तळे; गोवापुरीच्या जलव्यवस्थापनाचा लौकिक पुन्हा गवसेल?

Madhav Gadgil: खाण परिस्थिती नियंत्रणात आहे की नाही? गोव्यावर भरभरून प्रेम करणारे 'माधव गाडगीळ'

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

SCROLL FOR NEXT