Goa Milk News Dainik Gomantak
Video

Goa Milk Dairy: दुधाला प्रलंबित आधारभूत किंमत द्या, शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी

Goa Milk Rates: दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या दुग्ध व्यवसाय करणे परवडत नाही.

Sameer Panditrao

डिचोली: दूध उत्पादन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने गंभीरपणे लक्ष घालावे. गेल्या जवळपास सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेली दुधावरील आधारभूत किंमत चालू महिन्याच्या अखेरपर्यंत द्यावी. त्याचबरोबर दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आधारभूत दर वाढविण्यावर गंभीरपणे विचार करावा, अशी मागणी अखिल गोवा दूध उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे.

खोलपे-साळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ परब यांनी ही मागणी केली आहे. यावेळी आमठाणे दूध उत्पादक सोसायटीचे वैभव परब, पिर्ण सोसायटीचे गोविंद नाईक आदी वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार मागण्यांचा निश्चितच विचार करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वैभव परब आदी दूध उत्पादक शेतकऱ्यांनीही आपले विचार मांडले.

पशू वैद्यकीय सेवा उपलब्ध करा!

दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या दुग्ध व्यवसाय करणे परवडत नाही. तेव्हा सरकारने आधारभूत किमत ४० टक्क्यांवरून वाढवून द्यावी. गायी खरेदी करण्यासाठी सवलत द्यावी. दूध उत्पादकांसाठी असलेल्या योजना सुलभ कराव्यात. आपत्कालीनप्रसंगी पशु वैद्यकीय सेवा उपलब्ध करावी, अशी मागणीही रघुनाथ परब यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Party Youth: गोवा फॉरवर्ड पक्षात 30 हून अधिक युवकांचा प्रवेश; 'जेन झी'ने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दाखवून दिली-विजय सरदेसाई

Monsoon Update: राज्यात पुन्हा पावसाचा कहर? IMD कडून चार दिवसांचा 'येलो अलर्ट', अनेक भागांत मुसळधार सरींची शक्यता

Youth Movement Against Paper Leak: अहंकाराचा पराभव अन् युवाशक्तीचा विजय; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यामागील 'जेन-झी'ची ताकद

Viral Video: दारूच्या नशेत जीव धोक्यात! रेल्वे रुळावर पडला तरुण; वेगात ट्रेन आली अन्... थरारक व्हिडिओ होतोय व्हायरल

Student Protest Over Paper Leak: 36 दिवसांचा लढा यशस्वी! 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनासमोर मोदी सरकारला अखेर नमते घ्यावेच लागले

SCROLL FOR NEXT