Goa Crime Dainik Gomantak
Video

Goa Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, संशयितास अटक; डिचोली पोलिसांची कारवाई

Bicholim Crime News: एका विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या अल्पवयीन मुलीला अत्यंत क्रूरपणे मारहाण करून घटनेचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याचा संतापजनक प्रकार डिचोलीत घडला आहे.

Sameer Amunekar

डिचोली: एका विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या अल्पवयीन मुलीला अत्यंत क्रूरपणे मारहाण करून घटनेचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याचा संतापजनक प्रकार डिचोलीत घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या भावाने डिचोली पोलिसांत तक्रार करताच डिचोली पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंद करून पडोसे-सत्तरी येथील गौरेश बारकेलो गावकर या १९ वर्षीय संशयित युवकाला अटक केली. या गुन्ह्यात वापरलेली व्हेस्पा स्कूटरही पोलिसांनी जप्त केली आहे.

हा अमानुष प्रकार गेल्या महिन्यात घडला असून, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. वाठादेव-सर्वण येथील निर्जनस्थळी असलेल्या मंदिरात घडला आहे. अशी माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या संशयित युवकाने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचीही संतापजनक माहितीही समोर आली आहे.

पिडीत मुलीच्या भावाने केलेल्या तक्रारीनुसार गेल्या १४ ऑक्टोबर रोजी गौरेश गावकर या संशयित युवकाने पीडित मुलीला जबरदस्तीने आपल्या स्कूटरवर बसवून वाठादेव-सर्वण येथे निर्जनस्थळी असलेल्या मंदिरात नेले. तिथे तिला बेदम मारहाण केली. तिचे डोके मंदिराच्या पायऱ्यावर आपटले. यात ती गंभीर जखमी झाली होती.

‘व्हिडिओ’मुळे प्रकरण उघड

क्रूरपणे मारहाण केल्या प्रकारणाची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही संशयित युवकाने पीडित मुलीला दिली होती. त्यामुळे ती भीतीने गप्प राहिली होती. मात्र अलीकडेच पीडित मुलीला मारहाण केल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लागलीच आज पीडित मुलीच्या भावाने डिचोली पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी बाल आणि पोस्को कायद्याखाली गुन्हा नोंद करुन संशयित युवकाला अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mining Auction: 'मेसर्स रॉयलाईन'कडून 12.68 लाखच मिळणार! खाण माल कमी असल्‍याचा कंपनीचा दावा मंत्रिमंडळाला मान्‍य

Goa Education Department: गणवेश, रेनकोटसाठीचे 1,100 रुपये! 15 जुलैपर्यंत थेट खात्यांत; परिपत्रक जारी, 8 हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

Bombay High Court: पत्नीनं घरकाम न करणं म्हणजे 'क्रूरता' नाही, हायकोर्टाने पतीला लगावली चपराक; नेमकं काय प्रकरण?

खरी कुजबुज: बाबूंना नेमके काय पाहिजे?

Goa: गोव्यातील भाजी उत्पादनात मोठी वाढ; राज्याला आत्मनिर्भरतेकडे पाऊल; बेळगावातून येणाऱ्या आवकीत दरदिवशी तब्बल 40 टनची घट

SCROLL FOR NEXT