Garbage Plant Visit Dainik Gomantak
Video

Garbage Plant Visit: विद्यार्थ्यांनी केला 'कचरामुक्तीचा' संकल्प! राणे हायस्कूलची डिचोली प्रकल्पाला भेट

Waste Processing Plant Lakhere Bicholim: कुडचिरे येथील सेकंड लेफ्टनंट जे. जे. राणे सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी डिचोली पालिकेच्या लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली. विद्यार्थ्यांनी कचऱ्यावरील प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर कचरामुक्तीचा संकल्प केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Garbage Plant Visit

डिचोली: कुडचिरे येथील सेकंड लेफ्टनंट जे. जे. राणे सरकारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी डिचोली पालिकेच्या लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाला भेट दिली. विद्यार्थ्यांनी कचऱ्यावरील प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतल्यानंतर कचरामुक्तीचा संकल्प केला. अभ्यासाचा एक भाग म्हणून शिक्षिका चेताली परब, बाबल मांद्रेकर आणि प्रभाकर पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कचरा प्रक्रिया प्रकल्पात कचरा व्यवस्थापन कसे करतात, त्याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.

प्लास्टिकचा वापर टाळा

दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. लहानसहान चुकांमुळे ती आणखी उग्र बनत आहे, असे स्वच्छतादूत राजेंद्र सावईकर यांनी सांगून प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळावा, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले. विश्‍‍वनाथ नाटेकर आणि विजयकुमार नाटेकर यांनीही मार्गदर्शन केले. शिक्षिका चेताली परब यांनी कचऱ्याची समस्या निर्माण कशी होते आणि ती कशी टाळता येते, त्याची प्रात्यक्षिक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या हेतूने कचरा प्रकल्‍पाला भेट देण्यात आल्याचे सांगितले.

कचरा प्रकल्पस्थळी उभारण्यात आलेल्या बायो-मिथानेशन प्रकल्पाचीही विद्यार्थ्यांनी पाहणी केली. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर या प्रकल्पात बायो गॅस तयार कसा होतो?, बायो गॅसवर वीजनिर्मिती कशी होते? याबाबत विजयकुमार नाटेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT