Rohit Upadhyaay Dainik Gomantak
Video

तुम्ही कशाला येताय अटक करायला? मीच येतो गोव्यात, करदात्यांचे पैसे खर्च करु नका! Video

Viral Video: रोहितने पत्रकारिता गुन्हा नसल्याचे म्हणत त्याने इंस्टाग्रामद्वारे मुख्यमंत्री सावंतांना मुलाखत देण्याचे आवाहन केले आहे.

Pramod Yadav

Youtuber आणि पत्रकार असणाऱ्या रोहित उपाध्याय याने गोवा सरकारच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या विविध व्हिडिओमुळे तो अडचणीत सापडला आहे. गोवा सरकारची बदनामी केल्याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस त्याचा हरियाणा आणि दिल्लीत शोध घेत आहेत.

काही सोशल मिडिया इन्फ्युएन्सर गोव्याची बदनामी करत असल्याचा आरोप केला जात असून, याविरोधात गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोहीम उघडली आहे.

याप्रकरणी आता Youtuber रोहित उपाध्याय याने स्पष्टीकरण दिले आहे. मला अटक करण्यासाठी तुम्ही कशाला येताय? मी गोव्यात येतो विनाकरण करदात्यांचे पैसे खर्च करु नका, असे रोहितने म्हटले आहे.

रोहितने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपावर स्पष्टीकरण देणारी एखादी मुलाखत द्यावी, असे आवाहन देखील त्याने केले आहे.

पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्या रोहित उपाध्यायने अलिकडेच गोवा सरकारचा विविध भ्रष्टाचारावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यात रोहितने विधानसभा अधिवेशनातील संदर्भाचा दाखला देत, गोव्यात झुवारी जमीन प्रकरणात ५० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला.

शिवाय ४० लाखांचे लाडू आणि व्हिआयपी लोकांच्या दळणवळणात वारेमाप खर्च झाल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. यावरुन गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने त्याचा शोध घेतला जात आहे.

याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर रोहितने पत्रकारिता गुन्हा नसल्याचे म्हणत त्याने इंस्टाग्रामद्वारे मुख्यमंत्री सावंतांना मुलाखत देण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT