Dr Divya Rane birthday Dainik Gomantak
Video

वाढदिनी दोन प्रकल्पांची भेट, आमदार दिव्या राणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Dr Divya Rane birthday: पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Sameer Amunekar

वाळपई: पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिनी मतदारसंघातील दोन नव्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यानिमित्त सत्तरीत विकासाची नवी पर्वणी अनुभवायला मिळाली. मोर्ले आणि केरी येथील नव्या पंचायत इमारतींचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, मंत्री सुभाष फळदेसाई तसेच आमदार डॉ. दिव्या राणे उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार दिव्या राणे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “अल्पावधीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबविणे सोपे नाही. मात्र, दिव्या राणे यांनी ते करून दाखवले आहे. भाजप सरकार ‘अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय’ या तत्त्वांवर काम करते. गावागावांत पंचायत इमारती उभारून प्रशासन जनतेच्या दारात पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

मोर्ले पंचायत इमारतीसाठी सुमारे ६० लाख रुपये, तर केरी पंचायत इमारतीसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या इमारतींचा उपयोग महिलांसाठी, युवकांसाठी प्रशिक्षण, रोजगारविषयक कार्यशाळा आणि विविध उपक्रमांसाठी व्हावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दरम्यान, केरी येथील आजोबा मंदिर परिसरात आमदार डॉ. दिव्या राणे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सत्तरीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. सर्वांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री सुभाष फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य नामदेव च्यारी, निलेश परवार, प्रेमनाथ दळवी, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, केरी सरपंच नंदिता गावस तसेच इतर सरपंच, पंच सदस्य, नागरिक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने

उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Middle East War: एलपीजी, पेट्रोल अन् डिझेल आणखी महाग होणार? ट्रम्प-नेतान्याहूकडून मोठ्या हल्ल्याची तयारी; 'टार्गेट लिस्ट' बनवली

SCROLL FOR NEXT