Dharbandora Accident 
Video

Dharbandora Accident: धारबांदोडा येथे टेम्पो आणि दुचाकीची धडक; एक जण गंभीर जखमी

Dharbandora Accident News: धारबांदोडा परिसरात भीषण रस्ते अपघात घडला. यामध्ये एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

Manish Jadhav

धारबांदोडा परिसरात भीषण रस्ते अपघात घडला. यामध्ये एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हा अपघात एका वेगाने येणाऱ्या टेम्पो आणि दुचाकीमध्ये झाला. मिळालेल्या माहितीनुसार, धारबांदोडा येथील मुख्य रस्त्यावर दुचाकी आणि टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दुचाकीस्वार रस्त्यावर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला की अन्य काही कारणास्तव, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT