Corgao Gram Sabha Dainik Gomantak
Video

Corgao: मेगा प्रकल्पांच्या परवानगीवरुन कोरगाव ग्रामस्थ आक्रमक, ग्रामसभेला माहिती देण्याची मागणी

Korgao Gram Sabha: कोरगाव ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना दिलेले ‘ना हरकत’ दाखले त्वरित मागे घेण्यास ग्रामस्थांनी भाग पाडले.

Sameer Panditrao

Corgao Gram Sabha Mega Project Issue

पेडणे: कोरगाव ग्रामसभेत मेगा प्रकल्पांना दिलेले ‘ना हरकत’ दाखले त्वरित मागे घेण्यास ग्रामस्थांनी भाग पाडले. यापुढे मेगा प्रकल्प तसेच अन्य मोठे प्रकल्प कोरगावात येत असल्यास पूर्वकल्पना ग्रामसभेत देऊनच त्यानंतरच परवानगी देण्यात यावी, असा ठराव ग्रामसभेत संमत करण्यात आला.

ग्रामसभेत पंचायत मंडळ स्वतःच्या फायद्यासाठी अशा प्रकल्पांना परवानगी देत असल्याचा आरोप यावेळी नरेश कोरगावकर, राहुल भगत तसेच अन्य ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला. यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत ठरावही संमत झाला होता, मात्र देवसू येथील तसेच माईण- कोरगाव येथील मेगा प्रकल्प, बांधकामासाठी ग्रामसभेत ठराव घेऊन त्या ठरावाला बगल देण्याचे काम पंचायत मंडळाने केल्याने ग्रामस्थ आक्रमक बनले व पंचायत मंडळाला धारेवर धरले. सरपंच अब्दुल करीम नाईक यांनी वेळोवेळी ग्रामसभेला ‘ना हरकत’ दाखल्याबाबत आपली बाजू पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक आक्रमक झाल्याने ग्रामसभेत बराच गदारोळ झाला. सरपंच अब्दुल करीम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्राम सभेच्या व्यासपीठावर उपसरपंच दिवाकर जाधव, पंच सदस्य तथा माजी सरपंच अनुराधा कोरगावकर पंच सदस्य नीता नर्से, कल्पिता कलशावकर, देविदास नागवेकर, उमेश चारी, पंच सदस्य लौकक शेट्ये, पंचायत सचिव श्रद्धा कोरगावकर गट विकास कार्यालयाचे निरीक्षक तीळवे हे होते.

कोरगाव पंचायततर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, मात्र या कॅमेऱ्याची देखरेख कोण ठेवतो, कॅमेराची तपासणी करण्यासाठी पंचायत कार्यालयात युनिट बसवावा, संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी जगदीश तोरस्कर, प्रकाश तळवणेकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT