CM Pramod Sawant Dainik Gomantak
Video

Navelim: 2027 च्या निवडणुकीत नावेलीमध्ये भाजपा पुन्हा एकदा कमळ फुलवणार

CM Pramod Sawant: . गोमंतकीयांसाठी विविध योजना व उपक्रम राबविले आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नावेली मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

Sameer Panditrao

सासष्टी: भाजप सरकारने गोव्यासाठी पुढील १०० वर्षांच्या विकासाचा विचार करून भरघोस तरतूद करून ठेवली आहे. डबल इंजिन सरकारने गोव्यात ३० हजार कोटी रुपयांच्या साधनसुविधा उभारल्या आहेत. काँग्रेस पक्षाला त्यांच्या कार्यकाळात जे जमले नाही, ते भाजप सरकारने गत १० वर्षांत करून दाखवले आहे. गोमंतकीयांसाठी विविध योजना व उपक्रम राबविले आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नावेली मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, माजी सभापती विश्र्वास सतरकर, राज्य सचिव सर्वानंद भगत, दक्षिण गोवा जिल्हा भाजप अध्यक्ष प्रभाकर गावकर, जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक, दवर्लीचे सरपंच साईश राजाध्यक्ष, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, की सरकारी योजना व पक्षाची ध्येय धोरणे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे कार्यकर्त्याचे काम आहे. आम्हाला कार्यकर्ते केवळ निवडणुकांपुरते नको आहेत. त्यांनी नियमीत मतदारांच्या संपर्कात असावे ही आमची अपेक्षा आहे. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांनी आपल्या मतदारसंघातील समस्या सरकार मार्फत लवकरात लवकर सोडविल्या जातील, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT