Leopard Car Accident in Goa
डिचोली: नाणूस परिसरात फाशात अडकून बिबट्या मृत्युमुखी पडण्याची घटना ताजी असतानाच, डिचोली शहरात भरलोकवस्तीजवळ धावत्या मोटारगाडीला धडकल्याने एक बिबट्या जखमी झाला.
व्हाळशी-डिचोली या मुख्य रस्त्यावरील साष्टीवाडा-बोर्डे परिसरात काल शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना असून, अपघाताचे दृश्य तेथीलच एका बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे.
मुळगाव येथून एक दाम्पत्य काल रात्री कारने डिचोलीच्या दिशेने येत होते. साष्टीवाडा येथील ‘ओंकार’ हॉटेलजवळ पोचताच अचानक एक बिबट्या त्यांच्या गाडीला धडकला. अपघातामुळे आवाज होताच शेजारील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रस्त्याने जाणाऱ्या काहीजणांनी आपली वाहने थांबवली. तोपर्यंत बिबट्या गायब झाला होता. मात्र बिबट्याची धडक बसल्याने कारच्या दर्शनी भागाची मोडतोड झाली. दरम्यान, वन खात्याने या प्रकाराची दखल घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.