Calangute Dainik Gomantak
Video

Calangute: कळंगुटमध्ये बेकायदा क्लब सील; पंचायतीची कारवाई

Calangute Illegal Club: कळंगुटमधील अनधिकृत व्यवसायांविरोधात स्थानिक पंचायतीने कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘टिटोस्‌’ लेनजवळ चालणारा ‘ला फोंटाना’ हा क्लब सील करण्यात आला.

Sameer Panditrao

म्हापसा: कळंगुटमधील अनधिकृत व्यवसायांविरोधात स्थानिक पंचायतीने कारवाईचा बडगा उगारला आहे. ‘टिटोस्‌’ लेनजवळ चालणारा ‘ला फोंटाना’ हा क्लब सील करण्यात आला. संबंधित क्लब कोणत्याही वैध परवान्याशिवाय सुरू असल्याचे तपासात उघड झाले.

स्थानिक ग्रामस्थांकडून क्लबमध्ये संशयास्पद व बेकायदा हालचाली सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर कळंगुट पंचायतीचे सचिव अर्जुन वेळीप यांनी पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली.

गावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पर्यटकांची फसवणूक करणाऱ्या दलालांच्या साखळीवर आळा घालण्यासाठी ही कठोर पावले उचलण्यात येत असल्याचे पंचायत सदस्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कळंगुट पंचायतीने या महिन्याच्या सुरुवातीपासून अनधिकृत व्यवसायांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वीही अनेक बेकायदा टॅटू पार्लर व क्लब सील करण्यात आले आहेत. परवाना नसलेल्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यवसायाला थारा दिला जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT