Fire breaks out in Calangute Flat Dainik Gomantak
Video

VIDEO: कळंगुटमध्ये फ्लॅटला भीषण आग; पासपोर्ट, सोनं, रोकड अन् महत्त्वाची कागदपत्रं जळून खाक

Fire breaks out in Calangute Flat: उत्तर गोव्यातील कळंगुट परिसरात एका निवासी फ्लॅटला भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले.

Sameer Amunekar

कळंगुट : उत्तर गोव्यातील कळंगुट परिसरात एका निवासी फ्लॅटला भीषण आग लागल्याने मोठे नुकसान झाले. नाईकवाडो येथे घडलेल्या या घटनेत घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच महत्त्वाची कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. विशेष म्हणजे, कुटुंबातील सदस्य कामासाठी आणि शाळेसाठी बाहेर गेले असताना ही आग लागल्याचे समोर आले आहे.

महत्त्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंचे नुकसान

आगीमध्ये फ्लॅटमधील सामान मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. कुटुंबाचे पासपोर्ट, विविध महत्त्वाची कागदपत्रे, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आगीत नष्ट झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमुळे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार हे नुकसान सुमारे ३ ते ५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका

दरम्यान, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर चार जण अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी बचावकार्य करत या चौघांची सुरक्षितपणे सुटका केली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच आग इमारतीच्या इतर भागात पसरू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अधिकृत आढावा घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT