Borim Tripurari Poornima, Shri Navdurga Devi Festival, Borim Sangodd Utsav  Dainik Gomantak
Video

Borim Sangodd Utsav: बोरये श्री नवदुर्गा देवीचो सांगोड उत्सव; Watch Video

Shri Navdurga Devi Borim: हजारो सुवासिनींनी नऊवारी लुगडी नेसून दागदागिने घालून आणि सुवासिक फुलांच्या फात्या माळून देवी नवदुर्गेच्या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सवातील दीपोत्सव जल्लोषात साजरा केला.

Sameer Panditrao

बोरी: हजारो दिवजांच्या मंद प्रकाशातील लखलखाटात बोरी नवदुर्गा देवीचा परिसर गुरुवार, ६ रोजी तेजाळून गेला होता. हजारो सुवासिनींनी नऊवारी लुगडी नेसून दागदागिने घालून आणि सुवासिक फुलांच्या फात्या माळून देवी नवदुर्गेच्या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सवातील दीपोत्सव जल्लोषात साजरा केला. या जत्रोत्सवानिमित्त राज्याबरोबरच शेजारच्या राज्यातील भाविकांनीही भाग घेऊन देवीचा नवस फेडला व नवस बोलण्यासाठी गर्दी केली होती.

राज्यातील या पहिल्या जत्रोत्सवानिमित्त सकाळी श्री नवदुर्गा देवी, श्री कमळेश्‍वर, श्री ग्रामपुरुष आदी पंचिष्ट दैवतांना विधिपूर्वक अभिषेक, पूजा-अर्चा झाली. अजित देवारी यांनी देवीची मूर्ती पाच रूपाने आकर्षकरीत्या सजवली होती. सकाळी श्रींचे तरंग सजवून अवसारी तरंगाचे आगमन तळयेवाडा-बोरी येथील श्री नारायणदेवाच्या मंदिरात आले. याठिकाणी पूर्वापार पद्धतीने धार्मिक विधी झाल्यावर तरंगाचे श्री नवदुर्गा मंदिरात वाजतगाजत आगमन झाल्यावर हजारो सुवासिनींनी हातात दिवजा पेटवून श्री नवदुर्गेची आणि तरंगाची ओवाळणी केली. या वार्षिक जत्रौत्सवात दिवजोत्सवात भाग घेण्यासाठी विविध भागात राहणाऱ्या देवीच्या कुळाव्यांच्या सुहासिनींनी भाग घेतला होता. या जत्रौत्सवानिमित्त खाजे, लाडू व अन्य पदार्थांची व अनेक तऱ्हेच्या वस्तूंची मोठी फेरी भरली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Marsh Drinking Beer: वादग्रस्त बोलणं पडलं महागात! फक्त '6 बिअर' बोलल्यामुळे मिचेल मार्शला संघातून 'डच्चू'! काय आहे नेमकं प्रकरण? Watch Video

Goa Police Constable Fraud: पोलिस कॉन्स्टेबलचा भांडाफोड! आंध्र प्रदेशातील बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली नोकरी; पणजी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

IND vs AUS 5th T20: मालिकेचा फैसला 'गाबा'वर! सूर्या ब्रिगेड देणार कांगारुंना कडवं आव्हान, कसा आहे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड?

SCROLL FOR NEXT