Birsa Munda Jayanti Dainik Gomantak
Video

Birsa Munda Jayanti: बिरसा मुंडा जयंती; काणकोणात शोभायात्रेची तयारी जोरात Video

Ramesh Tawadkar: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनाच्या औचित्याने १३ नोव्हेंबर रोजी, काणकोण तालुक्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

Sameer Panditrao

आगोंद: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आणि जनजातीय गौरव दिनाच्या औचित्याने १३ नोव्हेंबर रोजी, काणकोण तालुक्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज भाजप प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रवींद्र भवन परिषदगृहात बैठक पार पडली. या बैठकीस क्रीडामंत्री रमेश तवडकर, श्रीस्थळ पंचायतीच्या सरपंच सेजल गावकर, खोतिगावच्या सरपंच वृंदा वेळीप, आगोंदचे सरपंच निलेश पागी, चंद्रकांत वेळीप, विविध पंचायतीचे पंच, उपसरपंच, नगरपालिकेचे नगरसेवक, भाजप शक्तीकेंद्र प्रमुख, सामाजिक संघटनांचे प्रतिनिध आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

१३ रोजी होणाऱ्या या शोभायात्रेत सुमारे १०,००० कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षित असून त्यात सहा हजार महिला आणि चार हजार पुरुष कार्यकर्ते सहभागी होतील. विविध समाजातील युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि सांस्कृतिक गट या यात्रेत सहभागी होऊन एकता, समरसता आणि राष्ट्रीय अभिमानाचा संदेश देणार आहेत. याप्रसंगी रमेश तवडकर सांगितले, गोव्यात १३ नोव्हेंबर रोजी आयोजित शोभायात्रेत आदिवासी समाजाबरोबर इतर समाजांचाही सहभाग असेल, हीच खरी भारताची ताकद आहे. एकत्र येऊन आपण भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला नवी दिशा देऊ. या यात्रेद्वारे समाजातील सर्व घटकांमध्ये ऐक्य, समरसता आणि बंधुभाव दृढ होईल. शोभायात्रेच्या तयारीसाठी सर्व पंचायत, सामाजिक संस्था आणि युवक मंडळांनी जबाबदारीने काम करावे. हा केवळ एक सांस्कृतिक उपक्रम नाही, तर राष्ट्रीय एकात्मतेचा उत्सव आहे. आदिवासींच्या योगदानाचा गौरव करताना आपण सर्व समाजांनी मिळून भारताच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Khanapur Elephant Death: संतापजनक! खानापुरात विजेचा शॉक लागून 2 हत्ती ठार, झटका मशीनला वीजवाहिनी जोडल्याने दुर्घटना

Polem Loliem: 4 वर्षांच्या बालकाला अमानुष मारहाण, आईच्या अटकेसाठी पोळेवासीय एकवटले; मानवी तस्करीचा प्रकार उघडकीस

Horoscope: अनपेक्षित घटना फायदेशीर, आर्थिक लाभाची शक्यता; संयम ठेवा!

IND vs SA Final 2025: हरमनची टीम इंडिया बनली 'वर्ल्डकप चॅम्पियन'; वुल्फर्टची झुंजार शतकी खेळी ठरली व्यर्थ; दिप्ती शर्माच्या भेदक माऱ्याने केली कमाल! VIDEO

India vs Australia: चौथ्या टी-20 सामन्यापूर्वी टीम इंडियाला बसला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू अचानक मायदेशी, काय कारण?

SCROLL FOR NEXT