Bicholim Fire Incident Dainik Gomantak
Video

Bicholim Fire Incident: डिचोली मार्केटमध्ये कपड्यांच्या शोरूमला आग, 3 लाखांहून अधिक मालमत्ता भस्मभात

Bicholim Clothes Shop Fire News: शहरातील बाजार परिसरातील ''लाईफस्टायल'' या रेडिमेड कपड्यांच्या शोरूमला आग लागून, कपड्यांसह ३ लाखांहून अधिक मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

Sameer Panditrao

डिचोली: शहरातील बाजार परिसरातील ''लाईफस्टायल'' या रेडिमेड कपड्यांच्या शोरूमला आग लागून, किमती कपड्यांसह ३ लाखांहून अधिक रुपयांची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीची ही घटना काल (सोमवारी) रात्री उशिरा घडली.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन दुकानमालक आणि कामगार घरी गेले होते. त्यानंतर आगीची ही घटना घडली. रात्री बंद दुकानातून धूर बाहेर येत असल्याचे लक्षात येताच तेथील जागृत नागरिकांनी दुकान मालकाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाचे लिडींग फायर फायटर महेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी बंबसहीत घटनास्थळी धाव घेतली. त्वरित मदतकार्य हाती घेताना दुकानाला लागलेली आग वेळीच नियंत्रणात आणली.

विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह काल रात्री अवकाळी पाऊस पडला. पावसावेळी विजेची लपाछपीही सुरु होती. त्यामुळे दुकानामधील इन्व्हर्टरमध्ये शॉर्टसर्किट निर्माण होऊन आग लागण्याची ही घटना घडली असावी. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगीच्या या घटनेत कपड्यांसह दुकानातील इन्व्हर्टर जळाल्याने ३ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे दुकानमालकाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT