Bisons In Bicholim Lakhere Dainik Gomantak
Video

Bison Sighting: लाखेरेत गव्यांची वाढती दहशत! नागरिकांत घबराट; बंदोबस्त करण्याची मागणी

Bisons In Bicholim Lakhere: डिचोली शहरातील लाखेरे भागात सध्या गव्यांचा संचार वाढला असून रात्रीच्यावेळी हे गवे लोकवस्तीजवळ फिरत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: डिचोली शहरातील लाखेरे भागात सध्या गव्यांचा संचार वाढला असून रात्रीच्यावेळी हे गवे लोकवस्तीजवळ फिरत आहेत, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. या गव्यांनी परिसरात सध्या उच्छाद मांडला असून बागायती पिकांची नासधूस सुरू केली आहे. लोकवस्तीजवळच कळपाने गवे संचार करीत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बागायतदारही चिंतेत आहेत. गव्यांच्या दहशतीमुळे लोकही रात्रीच्यावेळी घराबाहेर पडण्याचे धाडस करीत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, किमान दहा गवे या परिसरात मुक्तपणे संचार करीत आहेत. गव्यांची दहशत वाढण्यापूर्वीच वन खात्याने या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी लाखेरे भागातील नागरिकांकडून होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून लाखेरे भागात गव्यांचा संचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

केळी, पोफळीचे नुकसान

रात्रीच्यावेळी गवे गायतीत घुसतात. लाखेरे येथील एक बागायतदार आनंद मांद्रेकर यांच्या बागायतीत या गव्यांच्या पावलांच्या खुणा उमटल्याचे आढळून येत आहे. गव्यांकडून त्यांच्या बागायतीतील केळी आदी पीक जमीनदोस्त करण्यात आले आहे. एखादेवेळी हे गवे आक्रमक झाले, तर माणसांवरही हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. बागायती पिकांची नुकसान रोखण्यासाठी आणि अनर्थ टाळण्यासाठी वन खात्याने या गव्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बागायतदार आनंद मांद्रेकर यांनी केली आहे.

खाद्याच्या शोधात गावात गव्यांची संख्या आता वाढली आहे. जंगल सोडून गवे लोकवस्त्यांजवळ येण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे घाट वा डोंगराळ परिसरात त्यांना खाद्य मिळणे दुरापास्त झाले आहे. खाद्याच्या शोधार्थ गव्यांनी आपला मोर्चा लोकवस्त्यांजवळ वळवला आहे. अलीकडच्या काळात बहुतेक ग्रामीण भागात गव्यांचे अस्तित्व जाणवत आहे.
अमृत सिंग, प्राणीमित्र

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! आरोपीने तुरुंगातून तक्रारदाराला लावला फोन; जेलमधील मोबाईल, ड्रग्जवरून हायकोर्ट संतप्त; दिले महत्वाचे निर्देश

Agonda Beach: आगोंद ‘कासव संवर्धन’ क्षेत्रात बेकायदा बांधकामांची रेलचेल! न्‍यायालय संतप्‍त; दिले चौकशीचे आदेश

Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरणात '50 कोटी' वायफळ खर्च! टास्क फोर्सकडून गंभीर चिंता व्यक्त; IIT मद्रासच्या अहवालातून त्रुटी उघड

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीसह शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदार संभ्रमात; झाली 'इतक्या' रुपयांची घट

Horoscope: लक्ष्मी मातेची कृपा! 'या' राशींना मिळणार धनलाभ आणि सुखाची बातमी, वाचा भविष्य!

SCROLL FOR NEXT