Bicholim Bike Accident Dainik Gomantak
Video

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Bicholim Bike Accident: डिचोली येथे झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तन्मय खरवत असे मृत तरुणाचे नाव असून, तो डिचोलीतील कुडचिरेची येथील रहिवासी होता.

Sameer Amunekar

डिचोली येथे झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तन्मय खरवत असे मृत तरुणाचे नाव असून, तो डिचोलीतील कुडचिरेची येथील रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास तो बोर्डे येथील जिममध्ये जाऊन घरी परतत होता. यावेळी त्याचा दुचाकीवरून स्वतःचा तोल जाऊन अपघात झाला. या अपघातात तन्मय गंभीर जखमी झाला होता.

अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC), बांबोळी येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे कुडचिरेम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, डिचोली पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची (UD) नोंद केली असून, अपघाताचा पुढील तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

Indian Super League: भरपाई वेळेत एफसी गोवाला मोठा धक्का! सोहम वर्षनेयच्या गोलने बंगळूर एफसीचा 2-1 ने विजय

SCROLL FOR NEXT