Bhatlem Gas Pipeline Burst Dainik Gomantak
Video

Bhatlem: मोठ्ठा आवाज आला आणि..; भाटले येथे कशी फुटली गॅस पाईपलाइन, पहा Video

Bhatlem Gas Pipeline Burst: गॅसवाहिनी फुटल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना ही बाब कळविली.

Sameer Panditrao

Bhatlem gas pipeline burst due to JCB

पणजी: भूमिगत मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामासाठी वापरण्यात येत असलेल्या जेसीबीचा फटका आज दोन ठिकाणी बसला. भाटले येथे श्रीराम मंदिराजवळ सुमारे १५ फूट खोल खोदकाम सुरू असताना गॅसवाहिनीला तडा गेला, तर पणजीत महापालिकेजवळ आत्माराम बोरकर मार्गावर मलनिस्सारणाची जुनी वाहिनी जेसीबीच्या धक्क्यामुळे फुटली.

भाटले येथे गॅस बाहेर पडताच बाजूला साचलेल्या पाण्याचा फवारा गॅसमुळे हवेत उडाला. गॅसवाहिनी फुटल्याचे समजताच कर्मचाऱ्यांनी इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना ही बाब कळविली. शिवाय वाहतूक पोलिसांनी येथून जाणारी वाहतूक थांबविली. भूमिगत गॅसपुरवठा करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधल्यानंतर या वाहिनीतील गॅसपुरवठा बंद करण्यात आला. सुमारे तीन तासांनंतर गॅस वाहिनीची गळती काढण्याचे काम पूर्ण झाले.

मोठ्या आवाजानंतर कामगारांचे पलायन

रविवारी सायंकाळी भाटले येथील श्रीराम मंदिराजवळ मलनिस्सारण वाहिनीसाठी जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू होते. सुमारे १५ फूट खोल भूमिगत असलेल्या गॅसवाहिनीला जेसीबीचा धक्का बसला. धक्का बसताच मोठा आवाज आल्याने खड्ड्याशेजारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तेथून तत्काळ पळ काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT