Bhagut Utsav Goa Dainik Gomatnak
Video

Bhagut Utsav Goa: भगुत उत्सव - 300 वर्सांची परंपरा मनयली उत्साहात; Video

Bhagut Utsav Golavali: सुमारे ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवासाठी गोवा व महाराष्ट्रातील विविध भागांतून शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली.

Sameer Panditrao

वाळपई: ठाणे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या गोळावली गावात सिद्धेश्वर देवाचा भगुत उत्सव रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. सुमारे ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवासाठी गोवा व महाराष्ट्रातील विविध भागांतून शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली.

हा उत्सव सिद्धेश्वर देवाचा असून सिद्धेश्वर हे युगपुरुष व भगवान शंकरांचे अवतार मानले जातात. ‘भगुत’ ही या भागातील एक वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक परंपरा असून जंगलाशी नाते सांगणाऱ्या श्रद्धा-विधींमुळे या उत्सवाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या गावापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात असलेल्या एका गुहेत सिद्धेश्वराचा वास असल्याची श्रद्धा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांसह इतर भाविक येथे मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहून उत्सव साजरा करतात.

गावाच्या कल्याणासाठी श्री सिद्धेश्वरांनी येथे तपश्चर्या केल्याने त्यांचा आशीर्वाद सर्वांवर असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. भूतबाधा किंवा नकारात्मक शक्ती दूर होतात, असा विश्वास भाविकांमध्ये दृढ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका

"ग्रहांच्या राजाची मेहरबानी!" 'या' राशींसाठी सूर्यदेव रिअल हिरो; कष्टाला मिळणार भाग्याची जोड अन् बँक बॅलन्समध्ये होणार मोठी वाढ

ग्रामीण मुलांचा डंका- संपादकीय

Fatorda: फातोर्ड्यातील जॉगिंग ट्रॅक परिसरात शौचालयाची मागणी, अनेकांची गैरसोय; कचऱ्याचे ढीग पडून असल्याने नाराजी

Bicholim: डिचोली येथे भररस्त्यावर कार उभी करण्याचा प्रकार, बाजार परिसरात वाहतूक कोंडीमुळे लोक संतप्त

SCROLL FOR NEXT