Goa Accident: गोव्यात मध्यरात्री काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! अज्ञात वाहनानं 6 गायींना चिरडलं; 5 ठार, 1 देतेय मृत्यूशी झुंज

Verna Road Accident Cows Killed: वेर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास एका सुस्साट अवजड वाहनाने रस्त्यावर बसलेल्या 6 गायींना धडक दिली.
Verna Road Accident Cows Killed
Goa AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Verna Road Accident: वेर्णा येथे शुक्रवारी (5 जून) मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. वेर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास एका सुस्साट अवजड वाहनाने रस्त्यावर बसलेल्या 6 गायींना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये 5 गायींचा जागीच मृत्यू झाला, तर एक गाय गंभीररित्या जखमी झाली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळबळ उडाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू टीम आणि प्राणीमित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या गायीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने, तिला तातडीने पुढील उपचारासाठी ध्यान फाउंडेशनच्या गोशाळेत हलवण्यात आले. या बचावकार्यात स्थानिक जेकेएसएस (JKSS) ग्रुप, परशुराम गोमंतक गोशाळा सदन आणि दक्षिण गोवा जिल्हा प्राणी छळ प्रतिबंधक सोसायटीच्या (DSPCA) कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सर्व संस्थांच्या मदतीने जखमी गायीवर तातडीने वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले.

Verna Road Accident Cows Killed
Goa Accident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! सारमानस धक्क्यावर कार थेट नदीत कोसळली, पण...

या घटनेची गांभीर्याने दखल घेत दक्षिण गोव्याचे डीएसपीसीए राज प्रतीक यांनी रात्रीच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा सुरु केला. दरम्यान, वेर्णा पोलिसांनी या प्रकरणी वेगाने पावले उचलत गुन्हा दाखल केला असून, अपघात घडवून आणणाऱ्या वाहनाच्या चालकाला ताब्यात घेतले. हा अपघात नेमका कसा घडला आणि चालकाचा निष्काळजीपणा याला कारणीभूत होता का, या दिशेने वेर्णा पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. गोव्यात (Goa) रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसणाऱ्या मोकाट जनावरांचा आणि वाढत्या अपघातांचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com