बाणावली समुद्रात मंगळवारी (6 ऑगस्ट) सकाळी पुन्हा एकदा मच्छिमार बांधवांची बोट उलटल्याची घटना समोर आली. बोटीवरील 11 मच्छिमार पोहोत किनारी आल्याने जीवीतहानी टळली. तसेच, बोटीलाही पुन्हा किनाऱ्यावर आणण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, वाडी बाणावली समुद्रात मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजता मासेमारीसाठी गेलेली बोट पाण्यात उलटण्याची घटना घडली. काही दिवसांपूर्वी, कोलवा समुद्रकिनाऱ्यावरुन अशीच अपघाताची घटना समोर आली होती. हवामान आणि सुमद्राचा अंदाज न घेताच समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट किनाऱ्यापासून काही अंतरावर उलटली होती. बोटीमधील मच्छिमार बांधवांनी आरडाआरोड करताच, किनाऱ्यारील जीवरक्षक पर्यटक पोलिसांनी तात्काळ खवळलेल्या समुद्रात बुडणाऱ्या 13 मच्छिमारांसह बोटही किनारी आणली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.