Advalpal Gramsabha Dainik Gomantak
Video

Advalpal: खाण समर्थकांच्या आक्रमक भूमिकेमुळे विरोधाची ‘धार’ बोथट; अडवलपालमध्ये NOC मागे न घेण्याचा ठराव

Advalpal Gramsabha: सरपंचपद रिक्त असल्याने उपसरपंच विनश्री गावकर यांच्या अध्यक्षतेखाली अडवलपाल पंचायतीची ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेस अन्य सर्व पंच सदस्य उपस्थित होते.

Sameer Panditrao

Advalpal Gramsabha Mining Dispute

डिचोली: अडवलपाल पंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसभेत पुन्हा एकदा ‘खनिज’ प्रश्न तापला. मात्र, खाण समर्थकांच्या आक्रमक भूमिकेमुळे खाण विरोधातील ‘धार’ बोथट झाली. या गडबडीत खाणीसाठी दिलेली ‘एनओसी’ पंचायतीने मागे घेऊ नये, अशी जोरदार मागणी ट्रकमालकांसह खाण समर्थकांनी करून तसा ठरावही ग्रामसभेत संमत केला.

अडवलपाल पंचायतीची ग्रामसभा आज (रविवारी) पार पडली. या ग्रामसभेस ट्रकमालकांसह खाण समर्थक लोकांनी गर्दी केली होती. पंचायतीचे सरपंचपद रिक्त असल्याने उपसरपंच विनश्री गावकर यांच्या अध्यक्षतेखाली अडवलपाल पंचायतीची ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेस अन्य सर्व पंच सदस्य उपस्थित होते. पंचायत सचिव संजय परब यांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले.

मागील दोन ग्रामसभेत ‘एनओसी’चा हा मुद्दा तापला होता. मात्र, आजच्या ग्रामसभेत ट्रकमालकांसह खाण व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांनी खाणीला समर्थन देत आम्हाला खाण व्यवसाय हवा. खाण कंपनीला पंचायतीने दिलेली ‘एनओसी’ मागे घेऊ नये, अशी मागणी केली. मयूर कळंगुटकर यांच्यासह अन्य ट्रकमालक आणि खाण समर्थकांनी ही मागणी आजच्या ग्रामसभेत लावून धरली. तसा ठरावही ग्रामसभेत संमत केला. खाणीला समर्थन दिले असले, तरी गावचे प्रश्न सोडवा. गाव सांभाळून खाण व्यवसाय करावा, अशी मागणीही आजच्या ग्रामसभेत केली. ग्रामसभेला लोकांनी गर्दी केल्याने जागा अपुरी पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT