Goa Politics Dainik Gomantak
Video

Goa Politics: 'आप'चा लोकाभिमुख जाहीरनामा! प्रत्येक मतदारसंघांत मतदारांशी संवाद - वेन्झी व्हिएगस

Aap: डिसेंबर महिन्यात होणाऱ्या गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टी प्रत्येक मतदारसंघात मतदारांसमवेत बैठक घेऊन त्यांना हवा असलेला जाहीरनामा तयार करणार आहोत, अशी माहिती ‘आप’चे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी दिली.

Sameer Amunekar

मडगाव: डिसेंबर महिन्यात होणाऱ्या गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टी प्रत्येक मतदारसंघात मतदारांसमवेत बैठक घेऊन त्यांना हवा असलेला जाहीरनामा तयार करणार आहोत, अशी माहिती ‘आप’चे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी दिली.

आज मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्‍यांच्‍याबरोबर जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठी जाहीर करण्‍यात आलेले बाणावलीचे उमेदवार जोजफ पिमेंता, वेळ्‍ळीच्‍या उमेदवार इसाका फर्नांडिस तसेच कोलवाचे उमेदवार आंतोनियो फर्नांडिस हे उपस्‍थित होते.

असा जाहीरनामा करण्‍यासाठी बाणावली मतदारसंघात चार ठिकाणी अशा बैठका झाल्‍या असून ओडली, करमणे, सुरावली व कोलवा या ठिकाणी या बैठका झाल्‍या आहेत. या बैठकांमध्‍ये लोकांनी ज्‍या सूचना केल्‍या, त्‍या आम्‍ही लिहून घेतल्‍या असून या बाबी आम्‍ही स्‍थानिक जाहीरनाम्‍यात समाविष्‍ट करू, असे व्‍हिएगस यांनी सांगितले.

या उपक्रमाबद्दल बोलताना व्‍हिएगस म्‍हणाले, प्रत्‍येक मतदारसंघाचा जाहीरनामा बनवण्‍यासाठी मतदारसंघात जाऊन बैठका घेणार, स्थानिकांना जी कामे जिल्हा पंचायतींकडून होणे अपेक्षित आहेत त्‍याची यादी करून आम्‍ही जाहीरनामा तयार करणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT