Amit Palekar About NEP Dainik Gomantak
Video

Goa Education: विद्यार्थी, पालक, शिक्षकांना विश्वासात घेतले काय? राज्य सरकारच्या शिक्षण धोरणावरून पालेकरांची प्रश्नांची सरबत्ती

National Education Policy: पालक व शिक्षक या घटकांना विश्वासात घेऊन व उपलब्ध सुविधा पाहून योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे अमित पालेकर यांनी सांगितले.

Sameer Panditrao

Implementation of National Education Policy in Goa

पणजी: डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी तयार केलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण निश्चितच उत्तम आहे, परंतु त्याची अंमलबजावणी राज्यात योग्य पद्धतीने झालेली नाही. राज्य सरकारची सर्व धोरणे कागदावरील घोड्यासारखी असतात. धोरणांची योग्य अंमलबजावणी न करता केवळ ते कागदावरच नाचवतात. राष्ट्रीय शिक्षण धोरणाला (एनईपी) आपचा विरोध नाही. मात्र, त्याची विद्यार्थी, पालक व शिक्षक या घटकांना विश्वासात घेऊन व उपलब्ध पायाभूत सुविधा पाहून तिची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी सांगितले.

पक्षाच्या कार्यालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेस राजेश कळंगुटकर, बार्रेटो, सिंग्नापूरकर आदींची उपस्थिती होती. पालेकर म्हणाले, १ एप्रिलपासून दहावीचे वर्ग घेणार असल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र, यासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना विश्वासात घेतले काय? शिक्षण संस्था त्यासाठी राजी आहेत का? हे सरकारने अजिबात पाहिले नाही. राज्य सरकार आपण सर्वात आघाडीवर असल्याचा बागुलबुवा दाखवीत आले आहे. हर घर जल, उघड्यावरील शौचबंदी असे उपक्रम शंभर टक्के कागदावरच राबवण्यात आले. राज्यात तीन डीएड महाविद्यालये आहेत. दरवर्षी ५०० विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. त्यापैकी केवळ ५० जणांना रोजगार मिळतो, उर्वरित बेरोजगार होतात, असेही पालेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT