Rumdamol Davorlim Dainik Gomantak
Video

Rumdamol Davorlim: रुमडामळ-दवर्ली पंचायतीच्या 4 पंच सदस्यांना ठरवले अपात्र

Rumdamol Davorlim Panch: स्‍वत:च्‍या नातेवाईकांची प्रकरणे बैठकीत आलेली असताना हे पंचसदस्‍य त्‍या बैठकीत सामील झाले, असा दावा करून त्‍यांना अपात्र ठरवावे अशी तक्रार केली होती.

Sameer Panditrao

मडगाव: स्‍वत:च्‍या नातेवाईकांनी बांधलेल्‍या बेकायदेशीर बांधकामांसंदर्भांतील तक्रारीवर चर्चेसाठी बोलावलेल्‍या बैठकीत सहभागी झाल्‍याचा ठपका ठेवून रुमडामळ-दवर्लीच्या माजी सरपंच मुबिना फणीबंद, माजी उपसरपंच महमद मुश्‍‍तफा दोडामणी, महमद सैमुल्‍ला फणीबंद आणि झुबेदा बी. अगसर या चार पंच सदस्यांना पंच म्‍हणून अपात्र ठरविण्‍याचा निर्णय सासष्टीचे गटविकास अधिकारी आदर्श देसाई यांनी आज जाहीर केला.

दरम्‍यान, हा निकाल कायद्याला धरून नाही, असा दावा करून अपात्र पंच सदस्‍यांची बाजू मांडणारे ॲड. बायरन रॉड्रीगीस यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्‍या या निकालाला जिल्‍हा न्‍यायालयात आव्‍हान देण्‍यात येणार असल्‍याची माहिती प्रसार माध्‍यमांना दिली.

या प्रकरणाची पार्श्‍वभूमी अशी की, रुमडामळ-दवर्लीच्‍या सरपंच असलेल्‍या मुबिना फणीबंद आणि पंचसदस्‍य असलेले तिचे पती महमद सैमुल्‍ला फणीबंद यांचे वडील आझाद फणीबंद, महमद मुश्‍‍तफा दोडामणी यांचे वडील मेहबूब दोडामणी आणि पंचसदस्‍य झुबेदा अगसर हिचे वडील महमद अली अगसर यांनी रुमडामळ भागात बेकायदेशीर बांधकामे उभारल्‍याची तक्रार पंचायतीत करण्‍यात आली होती. यासंदर्भात चर्चेसाठी १८ जानेवारी २०२४ रोजी पंचायतीची बैठक ठेवण्‍यात आली होती. या बैठकीला वरील चारही पंचसदस्‍य उपस्‍थित होते. या बैठकीत या बेकायदेशीर बांधकामांविरोधात कुठलाही निर्णय घेण्‍यात आला नव्‍हता.

स्‍वत:च्‍या नातेवाईकांची प्रकरणे बैठकीत आलेली असताना हे चारही पंचसदस्‍य त्‍या बैठकीत सामील झाले, असा दावा करून त्‍यांना अपात्र ठरवावे अशी तक्रार उसगाव-फोंडा येथील मुकेश नाईक या व्‍यक्‍तीने सासष्टीच्‍या ‘बीडीओ’कडे केली होती. स्‍वत:च्‍या नातेवाईकांच्‍या संबंधी प्रकरणावर चर्चेसाठी बोलावलेल्‍या बैठकीत सदर पंचसदस्‍य सामील झाल्‍याने त्‍यांनी पंचायत राज कायद्याच्‍या कलम १२ (१) व ड तसेच कलम १२ (२) आणि कलम ५५ (४) चा भंग केल्‍यामुळे पंचायत कायद्याच्‍या तरतुदीप्रमाणे हे पंच अपात्र ठरतात, असा आदेश गटविकास अधिकारी देसाई यांनी आज दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT