Goa Accident Case Dainik Gomantak
Video

Goa Accident: म्हशीने दिली धडक, गावणे येथील ३१ वर्षीय दुचाकी चालकाचा मृत्यू

Goa Fatal Accident: गंभीर जखमी अवस्थेत तरुणाला इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले; पण तेथे त्याचा मृत्यू झाला.

Pramod Yadav

फोंडा: गावणे येथे रस्त्यावर बसलेल्या म्हशीला दुचाकीची जोरदार ठोकर बसल्याने राजीनवाडा येथील दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री घडला.

दीक्षय गुरुदास गावडे (वय ३१ वर्षे) हा दुचाकीस्वार (जीए-०५-क्यू-२११९) या क्रमांकाच्या दुचाकीवरून कोनार-गावणे भागात येत असताना रात्री रस्त्यावर बसलेल्या म्हशीला त्याच्या दुचाकीची जोरदार ठोकर बसली.

या अपघातात दीक्षय याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला गंभीर जखमी अवस्थेत इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले; पण तेथे त्याचा मृत्यू झाला. तो सार्वजनिक बांधकाम खात्यात कामाला होता. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT