ZHZB Box Office Collection  Dainik Gomantak
मनोरंजन

Adipurush: 'जरा हटके जरा बचके' पडला 'आदिपुरुष'वर भारी; प्रेक्षकांनी आदिपुरुषवर...

Adipurush: 'जरा हटके जरा बचके' चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर 74 कोटीची कमाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

Adipurush: आदिपुरुष रिलिज झाल्यापासून या चित्रपटावर मोठी टीका होताना दिसत आहे. 600 कोटी बजेट असलेला हा चित्रपट मोठी कमाई करेल असे म्हटले जात होते. पहिल्याच दिवशी 87 कोटींची कमाई करणाऱ्या आदिपुरुषने पठाण चा रेकॉर्ड मोडला होता. मात्र आता निर्मात्यांच्या पदरी अपयश येईल की काय अशी आशंका व्यक्त केली जात आहे.

पहिल्या तीन दिवसात 220 कोटीपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या आदिपुरुषला पुढच्या चार दिवसात 40 करोड देखील कमावणे शक्य झाले नाही. सोमवारपासून सलग यामध्ये घट दिसून येत आहे. प्रेक्षकांनी आदिपुरषकडे पाठ फिरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र आदिपुरुषच्या आधी रिलिज झालेला जरा हटके जरा बचके हा चित्रपट आजही चांगली कमाई करताना दिसत आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहीतीनुसार, जेव्हा आदिपुरुष रिलिज झाला होता तेव्हा जरा हटके जरा बचके ची कमाई कमी झाली होती. मात्र आदिपुरुषचा प्रभाव कमी झाल्यानंतर जरा हटके जरा भटके या चित्रपटाने पून्हा चांगली कमाई करण्यास सुरुवात केली आहे. या आठ दिवसात आदिपुरुषपेक्षा जरा हटके जरा बचके चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. सध्या जरा हटके जरा बचके चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर 74 कोटीची कमाई केली आहे.

विक्की कौशल आणि सारा अली खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. प्रेक्षक चित्रपटावर भरभरुन प्रेम करताना दिसून येत आहे. दरम्यान, आदिपुरुष वादात अडकला असून आता आदिपुरुष किती कमाई करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘मी पत्रकार असतो तर ...’ सरदेसाईंच्या मिश्किल प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा; Watch Video

Mohammed Siraj: 'मी बोल्ड करतो, तेंव्हाच सेलिब्रेशन करतो'! टीका करणाऱ्या इंग्लंडच्या चाहत्यांवर सिराजचा बाऊन्सर

Rainforest Challenge 2025: खडकाळ वाटा, पाणथळ रस्ता आणि 'रेनफॉरेस्ट चॅलेंज'चा थरार..

America Arms Supply: अमेरिकेने दिली पाकला शस्त्रे! भारताची आक्रमक भूमिका; 1971 ची बातमी केली Twit

Goa Assembly Live: रंगमंच कलाकार, उद्योजक परेश जोशी यांचे निधन

SCROLL FOR NEXT