Bollywood actress Yami Gautam Dainik Gomantak
मनोरंजन

Birthday Special: यामी गौतम बद्दल जाणून घ्या तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमचा (Yami Gautam) जन्म हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे झाला आणि तिचे बालपण चंदीगडमध्ये गेले. तिचे वडील मुकेश गौतम हे पंजाबी चित्रपट दिग्दर्शक आहेत. तिला सुरिली गौतम नावाची एक बहीण देखील आहे आणि ती चित्रपटांमध्ये काम करते. 'पॉवर कट' या पंजाबी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यामीने कायद्याची ऑनर्स डिग्री घेतली होती.

यामीने टीव्हीवरही भरपूर काम केले आहे. अॅड फिल्म्समध्येही दिसली. ती चांद का पार चलो, राजकुमार आर्यन, ये प्यार ना होगा काम, मीठी छूरी आणि CID च्या एका एपिसोडमध्ये देखील दिसली. फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीतूनही तिला बरीच ओळख मिळाली.

यामी गौतमने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात उल्लासा उत्साहा (Ullasa Utsaha) या चित्रपटातून केली होती. तो कन्नड चित्रपट होता. यानंतर तिने 'एक नूर' या पंजाबी चित्रपटात काम केले. तिने 'विकी डोनर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आयुष्मान खुरानानेही या चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजित सरकार यांनी केले होते.

यानंतर यामी गौतमच्या करिअरमध्ये तेजी आली, तिला मोठे चित्रपट मिळू लागले. टोटल सियापा, अॅक्शन जॅक्शन, बदलापूर, सनम रे, जुनूनियत, काबिल, सरकार 3, बत्ती गुल मीटर चालू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, बाला आणि या वर्षी ती भूत पोलिसात दिसली. तिचे अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ती अभिषेक बच्चनसोबत 'दसवी'मध्ये दिसणार आहे.

यामी गौतमने 4 जून 2021 रोजी दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले. दोघे बराच काळ जवळ होते. यामीने आदित्य धरच्या 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात काम केले होते. यादरम्यान दोघेही जवळ आले. दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. या दोघांची जोडी खूप आवडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पिराचीकोंड-डिचोली येथील बेकायदेशीर झोपडपट्टी हटविण्यास सुरुवात, परिसरात तणाव

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात 'मटका खुलेआम', केवळ ३१८ प्रकरणांची नोंद; 'कडक कारवाई'च्या आदेशाला वाटाण्‍याच्‍या अक्षता

Goa Drugs Case: अक्षयकुमारला ओडिशात अटक; ड्रग्‍जडिलिंग प्रकरणी पाच दिवसांची कोठडी

Ganthvol: गोव्याच्या प्रेरणादायी विद्यार्थी चळवळीचा इतिहास ‘गांठवल’मधून उलगडणार

Bastora Crime: 'अंगावरील दागिने सांभाळा..' अशी बतावणी करत तोतया सीबीआय पोलिसांचा दागिन्यांवर डल्ला

SCROLL FOR NEXT