Pushpa 2
Pushpa 2 Dainik Gomantak
मनोरंजन

पुष्पा-2 मध्ये होणार श्रीवल्लीचा मृत्यू? काय म्हणाले चित्रपटाचे निर्माते वाचा एका क्लिकवर

दैनिक गोमन्तक

‘पुष्पा’ (Pushpa: The Rise) 2021 रोजी रिलीज झालेल्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामधील गाण्यांना तसेच डायलॉग्सला प्रेक्षकांची भरगोस पसंती मिळाली. चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुननं (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदनानं (Rashmika Mandana) प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात आहे. रश्मिकानं या चित्रपटामध्ये श्रीवल्ली ही भूमिका साकारली. पुष्पा चित्रपटाच्या दुसऱ्या भागातमध्ये श्रीवल्ली (Srivalli) या भूमिकेचा मृत्यू होणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. एका मुलाखतीमध्ये या चित्रपटाचे निर्माते वाय रवी शंकर (Y Ravi Shankar) यांनी पुष्पा-2 च्या कथानकाबाबत सांगितलं.

श्रीवल्लीचा होणार मृत्यू?
पुष्पा चित्रपटाचे निर्माते वाय रवी शंकर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'लोक म्हणत आहेत की पुष्पा-2 मध्ये श्रीवल्लीचा मृत्यू होणार आहे, हे मी गेल्या काही दिवसांपासून ऐकत आहे. पण ही अफवा आहे. ' त्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितलं की पुष्पा-2 मध्ये श्रीवल्ली ही भूमिका असणार आहे. 'आता पुष्पा-2 चित्रपटाची तयारी सुरु आहे. आम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये शूटिंगला सुरुवात करणार आहोत', असंही वाय रवि शंकर यांनी सांगितलं.

पुष्पा या चित्रपटाच्या यशानंतर आता या 'पुष्पा द रूल पार्ट 2' हा या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आयकॉन आणि AA21 हे अल्लू अर्जनचे आगामी चित्रपट (Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुष्पा हा चित्रपट 17 डिसेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अॅमेझाॅन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षक पाहू शकतात. ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या फायर है में…’ या चित्रपटातील डायलॉगला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: सोशल मीडियावरही ‘व्होटिंग फिव्हर’; राज्यातील तरुणाईने साजरा लोकशाहीचा उत्सव

Lok Sabha Election 2024: ''वाढीव टक्का, भाजपचा विजय पक्का''; काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

SCROLL FOR NEXT