hit the first case Dainik Gomantak
मनोरंजन

झकास! 'हिट-द फर्स्ट केस' अन् 'शाबाश मिठू' ची बॉक्स ऑफिसवर शर्यत

राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा 'हिट-द-फर्स्ट-केस' ने बॉक्स ऑफिसवर शाबाश मिठूपेक्षा जास्त कमाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या तापसी पन्नूच्या शाबाश मिठू या चित्रपटाने पहिल्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर हात वर केले आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याचवेळी यासोबत रिलीज झालेला राजकुमार रावचा चित्रपटही काही विशेष कमाल करू शकलेला नाहीये. राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा 'हिट-द-फर्स्ट-केस' ने बॉक्स ऑफिसवर शाबाश मिठूपेक्षा जास्त कमाई केली आहे. (Wow Hit The First Case and Shabaash Mithu race at the box office)

गेल्या शुक्रवारी, तापसी पन्नूचा बायोपिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तेवढा चालत नाही आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी एकूण 40 लाखांची कमाई केली आणि त्याचवेळी राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा ​​यांचा चित्रपटही काही खास कमाल करत नाही आहे. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांचे फारसे मनोरंजन केलेले नाहीये. त्याचवेळी, राजकुमारच्या हिट-द-फर्स्ट-केस या चित्रपटाने पहिल्या दिवशी 1 कोटींचा गल्ला जमवला आहे.

दोन्ही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची निराशा केली. मिताली राजचा बायोपिक बनवणारा तापसीचा चित्रपट आता स्पष्टपणे फ्लॉपकडे बोट दाखवताना दिसून येत आहे. त्याचवेळी, राजकुमार आणि सान्याच्या चित्रपटाच्या दुस-या दिवशीच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 1.20 कोटींची कमाई केली. ही कमाई पहिल्या दिवसाच्या तुलनेत थोडी कमीच आहे.

तापसी पन्नूच्या चित्रपटाच्या दुसर्‍या दिवसाच्या कमाईचे आकडे सांगायचे तर चित्रपट दुसर्‍या दिवशी केवळ 70 लाखांची कमाई करू शकला आहे. यासह, पहिल्या दिवसाच्या तुलनेत हा आकडा ठीक होता, परंतु, कुठेही चित्रपट चालण्याची चिन्हे नाहीत.

या दोन्ही चित्रपटांकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या मात्र, चित्रपटाचा परफॉर्मन्स पाहून चाहत्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. आता राजकुमार रावचा चित्रपट आपल्या कलेक्शनमध्ये काही सुधारणा दाखवू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तर त्याच वेळी, तापसी पन्नूचा चित्रपट भविष्यात प्रेक्षकांचे मनोरंजन करेल की प्रेक्षकांची अशीच निराशा करेल? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT