Children’s Day Special | Cartoon Movies Dainik Gomantak
मनोरंजन

Children's Day Special: बालगोपालांना नेटफ्लिक्सवर 'या' खास चित्रपटांची मेजवानी

Children's Day Special: या बालदिनानिमित्त लहान मुलांना खूश करणार्‍यासाठी हे चित्रपट आणि कार्टून सिरीयल दाखवा.

दैनिक गोमन्तक

Children's Day Special: देशभरात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. आज 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन..मग या बालदिनानिमित्त सर्व लहान मुलांसाठी काय बरं स्पेशल करावं. तर तुम्ही बच्चेकंपनीला नेटफ्लिक्सवरील काही खास चित्रपट दाखवू शकतात. जी मुले आणि कुटुंब दोघेही 14 नोव्हेंबरला एक खास दिवस बनवण्यासाठी एकत्र पाहू शकतात.

त्यात पहिला चित्रपट (Movies) म्हणजे पराक्रमी छोटा भीम (Mighty Little Bheem) नेटफ्लिक्सची भारतातील पहिली अ‍ॅनिमेटेड मालिका, राजीव चिलाका, मायटी लिटल भीम यांनी तयार केली आहे. यात एक निष्पाप पण अति-सशक्त चिमुकला लिटल भीम आणि एका लहान भारतीय शहरातील त्याच्या खोडकर साहसांची ही स्टोरी आहे.

तसेच, माय लिटल पोनी अ न्यू जनरेशन (My Little Pony A New Generation) हा रॉबर्ट कुलेन आणि जोस उचा दिग्दर्शित एक काल्पनिक विनोदी चित्रपट आहे. ज्यात पोनी आणि तिचे युनिकॉर्न आणि पेगासी मित्रांवर केंद्रित आहे. त्यात जे इक्केक्स्ट्रियाची जादू गमावल्यामुळे त्यांच्या जगात सौंदर्य आणि एकता परत आणण्याचा मार्ग शोधण्यास एकत्र प्रयत्न करतात.

तारक मेहता का छोटा चष्मा (Taarak Mehta Kka Chhota Chashmah) हा तारक मेहता का उल्टा चष्मा या टीव्ही शोपासून प्रेरित आहे. ज्यात गोकुळधाम सोसायटी त्यांच्या विविध संकटांमधून जात असताना त्यांच्या अडथळ्यांवर सर्व एकत्रितपणे मात करतात. हा शो असित कुमार मोदी यांनी तयार केला असून संतोष नारायण पेडणेकर यांनी दिग्दर्शन केले आहे.

मॅन vs बी (Man vs Bee) एक व्यावसायिक स्त्री तिच्या मालमत्तेची देखभाल करण्यासाठी एका बेरोजगार बेघर माणसाला कामावर ठेवते. पण एक वाईट मधमाशी पाठलाग करत असताना तेव्हा गोष्टी अत्यंत चुकीच्या होतात. ही एक विनोदी मालिका आहे.

तसेच, द सी बीस्ट (The Sea Beast) हा चित्रपट एक तरुण मुलगी आणि एक प्रसिद्ध समुद्री राक्षस शिकारीभोवती केंद्रित आहे. अकबर बिरबल सारख्या ज्यात बिरबल आपली बुद्धिमत्ता कशी वापरतो हे दाखवले आहे. अशा शोमधून मुलांना खूप शिकायला मिळेल. तसेच, संजय दत्त आणि राजीव कपूरचा (Toolsidas Junior) टूल्सीदास ज्युनियर या चित्रपटात कोलकातामध्ये स्नूकरच्या हृदयद्रावक खेळात हरलेल्या टूल्सीदासची हृदयस्पर्शी स्टोरी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT