Karan Johar
Karan JoharDainik Gomantak

Karan Johar च्या मुलांचा 'डिस्कोडिवाने'वर डान्स, पाहा Viral Video

Karan Johar Latest News: करण जोहरच्या मुलांचा मस्ती करतानाचा एक व्हिडिओ सोशल मिडियवर होत आहे.

करण जोहर (Karan Johar) बॉलिवूडमधील एक अतिशय दिग्गज चित्रपट निर्माता आहे. ज्याने 'कभी खुशी कभी गम' आणि 'कुछ कुछ होता है' सारखे अनेक सुपरहिट चित्रपटांची मेजवाणी प्रेक्षकांना दिली आहे. करण जोहर त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील सोशल मिडियावर चर्चेत असतो. दरम्यान, त्यांनी मुलांसोबत मस्ती करतांनाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • करण जोहरने शेअर केला व्हिडिओ

करण जोहरने रविवार आपल्या मुलांसोबत मस्ती केली आहे. आपल्या मुलांचा व्हिडिओ शेअर करत करणने लिहिले, 'डिस्को दिवाने चे सेकंड व्हर्जन'. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करणची दोन्ही मुलं करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातील 'डिस्को दीवाने' हे गाणं (Song) आपापल्या शैलीत गाताना दिसत आहेत. यासोबतच त्यांची दोन्ही मुलेही गाणी गाताना नाचताना (Dance) दिसत आहेत. 

करण जोहरचा वर्कफ्रंट

'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाद्वारे (Movie) करण जोहर दीर्घ काळानंतर चित्रपट दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, शबाना आझमी, रणवीर सिंग, जया बच्चन आणि धर्मेंद्र यांसारखे अनुभवी कलाकार आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज आहेत. या चित्रपटापूर्वी करणने 'ए दिल है मुश्किल' दिग्दर्शित केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com